Loksabha 2019

Loksabha 2019 : निवडणुकीसाठी प्रशासनात ‘महिला राज’

अनिल सावळे

पुणे - पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत प्रशासनातील महिला अधिकाऱ्यांचा बोलबाला आहे. या निवडणूकप्रक्रियेत पुरुष अधिकाऱ्यांसोबतच महिला अधिकारीही तेवढीच महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.

उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह या उपजिल्हा निवडणूक अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदाची जबाबदारी ‘पीएमआरडीए’च्या अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी कविता द्विवेदी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नोंदणी व मुद्रांकच्या अतिरिक्‍त जिल्हाधिकारी नयना बोंदार्डे यांच्यावर निवडणूक निरीक्षक व्यवस्थापन, ‘यशदा’ येथील अतिरिक्‍त जिल्हाधिकारी ज्योत्स्ना पडियार आणि ‘पीएमआरडीए’च्या उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्यावर निवडणूक प्रशिक्षण,  निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, कायदा व सुव्यवस्था आणि आचारसंहिता कक्ष, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी वर्षा लढ्ढा (साहित्य व्यवस्थापन), उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे (बारामती), समीक्षा चांदरकर (शिरूर) आणि  तहसीलदार पल्लवी घाटगे (निवडणूक शाखा), तहसीलदार रूपाली सरनोबत (निवडणूक साहित्य), तहसीलदार स्वाती पाटील (डॅशबोर्ड मॉनिटरिंग), तहसीलदार उज्ज्वला सोरटे (सूक्ष्म निरीक्षक), रोहिणी मोरे (दिव्यांग सेल), तहसीलदार राजश्री मोरे (टपाली मतदान), पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार आणि ‘एसआरए’ प्रकल्पातील उपजिल्हाधिकारी वैशाली इंदानी या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. भूसंपादन  विभागातील उपजिल्हाधिकारी नीता सावंत-शिंदे पुणे लोकसभा मतदारसंघातील पुणे कॅन्टोन्मेंट, उपजिल्हाधिकारी आरती भोसले बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर, उपजिल्हाधिकारी रेश्‍मा माळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी येथे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर अस्मिता मोरे यांना शिवाजीनगर येथे मतदार नोंदणी अधिकारीपदाची जबाबदारी दिली आहे.

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघापैकी ११ मतदारसंघांमध्ये अतिरिक्‍त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महिलाच आहेत. त्यात सुषमा पैकीकारी (आंबेगाव), सुचित्रा आमले पाटील (खेड आळंदी), सोनाली मेतकरी (इंदापूर), आर. एस. हावळ-बारटक्‍के (चिंचवड), अर्चना यादव (वडगावशेरी), शैलजा पाटील (शिवाजीनगर), सुनीता नेरलेकर (कोथरूड), अमिता तळेकर (पर्वती), स्मिता पवार (हडपसर), सुरेखा दिवटे (पुणे कॅन्टोन्मेंट) आणि तृप्ती कोलते पाटील (कसबा पेठ) यांचा समावेश आहे. समन्वय अधिकारी म्हणून तहसीलदार वर्षा पवार यांच्यावर व्होटर्स हेल्पलाइन, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी नंदिनी आवाडे यांच्यावर पेड न्यूज - प्रसारमाध्यमे आणि उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांच्यावर कायदा व सुव्यवस्था, पोलिस बंदोबस्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशाराणी पाटील यांच्यावर ‘स्वीप’ व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविली आहे. तहसीलदार अर्चना तांबे यांच्यावर बैठक नियोजन आणि समन्वयाचे कामकाज आहे.

प्रत्येक मतदारसंघात ‘सखी बूथ’ 
आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभानिहाय मतदारसंघात एका मतदान केंद्राचे व्यवस्थापन महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे राहणार आहे. बंदोबस्तासाठी महिला पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. महिला मतदारांची टक्‍केवारी वाढावी, यासाठी जिल्ह्यात एकूण २१ ‘सखी बूथ’ उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली.

निवडणुकीत कोणतेही काम अतिशय जबाबदारीने पार पाडणे महत्त्वाचे असते. प्रत्येक टप्प्यानुसार ती जबाबदारी वेळेत आणि अचूकपणे पार पाडणे आवश्‍यक असते. ही जबाबदारी महसूल विभागातील सर्व महिला अधिकारी सक्षमपणे सांभाळत आहेत, ही बाब लक्षणीय आहे.
- मोनिका सिंह, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT