Hasan Mushrif said, 10 sanitary napkins for one rupee for woman Hasan Mushrif said, 10 sanitary napkins for one rupee for woman
महाराष्ट्र बातम्या

एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन; हसन मुश्रीफ यांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दारिद्र्यरेषेखालील महिला, बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन (sanitary napkins) देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. ही योजना १५ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी शनिवारी (ता. २८) दिली. मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. (Hasan Mushrif said, 10 sanitary napkins for one rupee for woman)

मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या वर्षात मासिक पाळीच्या वेळी काळजी न घेतल्याने व सफाईच्या कमीमुळे जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला. हे प्रमाण कमी करण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील महिलांना नाममात्र एक रुपयामध्ये ग्रामविकास खात्याकडून १० सॅनिटरी नॅपकिन (sanitary napkins) देण्यात येणार आहेत.

भारतात दरवर्षी १२० दशलक्षहून अधिक महिलांना मासिक पाळीचा त्रास होऊन आजारांचा सामना करावा लागतो. भारतात केवळ १२ टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. तर महाराष्ट्रात ६६ टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. यातही शहरी भागातील महिला अधिक आहेत. ग्रामीण भागात फक्त १७.३० टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन वापरतात, असेही हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितले.

सर्वांना लाभ मिळावा हा उद्देश

महाराष्ट्रात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेत फक्त १९ वर्षांखालील मुलींना सहा रुपयात सहा नॅपकिन्स असलेली कीट पुरवण्यात येते. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील सर्व महिलांना लाभ मिळत नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत दारिद्र्यरेषेखालील सर्व युवती व महिलांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - ३१ ऑगस्ट २०२६

Video: अंपायरने नॉट आऊट दिलं, पण कर्णधार वैभव सूर्यवंशीचा मास्टरस्ट्रोक! शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाने मिळाली विकेट

Jat Wildlife Attack : सांगलीत धक्कादायक घटना! जतमधील अंकले येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात 75 वर्षीय पोलिस पाटलाचा दुर्दैवी मृत्यू, शेळ्या चारण्यासाठी गेले अन्...

Marathi News Live Updates : कोल्हापूर शहरात आज आणि उद्या कमी दाबाने होणार पाणीपुरवठा, काय आहे कारण?

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

SCROLL FOR NEXT