oxygen 
महाराष्ट्र बातम्या

‘मिशन वायू’तंर्गत 10 दिवसांत इतक्या कोटींची उपकरणे उपलब्ध

सकाळ डिजिटल टीम

पुणे- ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदींचा तुटवडा दूर करण्यासाठी ‘मिशन वायू’तंर्गत उद्योगांनी पुढाकार घेऊन तब्बल १०० कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे शासकीय आणि खासगी रुग्णालयांना अवघ्या दहा दिवसांत उपलब्ध करून दिली आहेत. त्याचा फायदा लाखो रुग्णांना होत आहे. त्यातील सुमारे ३५ कोटींचा निधी राज्यातील उद्योगांनी उभारला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये या उपकरणांचे वितरण सध्या सुरू आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) समन्वयातून निर्माण झालेल्या ‘पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स’ (पीपीसीआर) यासाठी राज्यात पुढाकार घेतला आहे. राज्याबाहेर त्यांना एसीटी ग्रॅंटस आणि स्वास्थ अलायन्स या संघटनांनी मदत केली. त्यातून ‘मिशन वायू’ हा उपक्रम सुरू झाली आहे. देशातील एक हजारपेक्षा जास्त उद्योग कंपन्या, उद्योजक आणि नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने निधीसाठी मदत केली. त्यातून अवघ्या १० दिवसांत सुमारे १०० कोटी रुपयांची उपकरणे देशात उपलब्ध झाली आहेत. देशातील कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता पीपीसीआरने सिंगापूरमधील टेमासेक फाऊंडेशनशी संपर्क साधला. त्यांनी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर सवलतीमध्ये उपलब्ध करून दिले तर, तर एअर इंडियाने वाहतुकीसाठी मदत केली. तसेच ॲमेझॉन इंडियाने या उपकरणांची देशातील वाहतूक मोफत केली. ओलम इंटरनॅशनल, केरी लॉजिस्टिक्स यांनीही मिशन वायूला मदत केली.

मिशन वायूतंर्गत कोरोनाचा संसर्ग वाढलेल्या सहा प्रमुख राज्यांवर लक्ष केंद्रीत केले. त्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील शासकीय रुग्‍णालयांपर्यंत संबंधित जिल्हाधिकऱ्यांमार्फत वैद्यकीय उपकरणे पोचविण्यात आली. ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणेला मर्यादा आहेत, त्या ठिकाणी उद्योगांनी पुढाकार घेतला. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय, सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालय यांनीही मिशन वायूसाठी सहकार्य केले.

मिशन वायूतंर्गत उपलब्ध केलेली उपकरणे

- ७८०० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर

- ८७५ बायपॅक व्हेंटिलेटर

- ५० हजार ऑक्सिमीटर

सुधीर मेहता (अध्यक्ष - एमसीसीआयए आणि मुख्य समन्वयक - पीपीसीआर) ः कोरोनाची स्थिती गंभीर आहे म्हणून चिंताक्रांत होण्यापेक्षा काही तरी पावले उचलली पाहिजेत, या भूमिकेतून पीपीसीआरच्या माध्यमातून ‘मिशन वायू’ सुरू करण्यात आला. पुण्यातील उद्योगांनी तसेच राज्यातील आणि बाहेरील उद्योग समूहांनीही त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे अल्पावधीत १०० कोटींची वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करता आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT