Dahi Handi  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Dahi Handi 2023: दहीहंडीच्या उत्सवात १९५ गोविंदा जखमी; १४ जणांची प्रकृती चिंताजनक

राज्यभरात काल दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यभरात काल (गुरूवारी) दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. राज्यभरात अनेक ठिकाणी गोविंदा पथकांनी थरावर थर लावत सलामी दिली. मुंबईसह ठाणे आणि पुणे अशा मोठ्या शहरातही दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला. परिसरात उत्साह आणि मोठा जल्लोष दिसून आला.

या उत्साहाच्या दरम्यान काही ठिकाणी गालबोटही लागल्याचे दिसून आले. मुंबईत दहीहंडी उत्सवामध्ये रात्री ९ पर्यंत तब्बल १०७ गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. जखमी गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

जखमी झालेल्या एकूण गोविंदापैकी १४ गोविंदाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर ६२ गोविंदाना प्राथामिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. ३१ जणांवर अद्यापही उपचार सुरू असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेने दिलेली ही आकडेवारी गुरूवारी रात्री ९ वाजेपर्यंतची आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

तर आता मिळालेल्या माहितीनुसार दहीहंडीदरम्यान एकूण १९५ गोविंदा जखमी झाले आहेत. १७७ गोविंदाना उपचार करून सोडण्यात आले आहे. तर १८ गोविंदांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

तर ठाण्यातील दहीहंडी उत्सवामध्ये १७ गोविंदा जखमी झाल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे. गोविंदांच्या पायाला, हाताला तर कमरेला दुखापत झाल्याची माहिती आहे. तर या जखमी गोविदांवर कळवा आणि सिव्हील रुग्णालयात उपचार करण्यात आले. यामधील कोणत्याही गोविंदाना गंभीर दुखापत झालेली नाही. प्राथामिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT