Mahacargo Sakal
महाराष्ट्र बातम्या

Mahacargo : अकराशे बसचे मालवाहूत रूपांतर; तीन वर्षांत १२७ कोटींचे उत्पन्न

राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) मालवाहतुकीत गेल्या तीन वर्षांत १२७ कोटी ५१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) मालवाहतुकीत गेल्या तीन वर्षांत १२७ कोटी ५१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. आयुष्य संपलेल्या १ हजार १२४ बसेसचे मालवाहू वाहनांत रूपांतर केल्याने महामंडळाला नवीन उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करण्यास यश आले आहे.

२० मे २०२० पासून महामंडळाने मालवाहतुकीला सुरवात केली. मे २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत मालवाहतुकीच्या ८१ हजार ६८४ फेऱ्या झाल्या. एकूण १ कोटी १८ लाख ५९ हजार ४०७ किलोमीटर वाहने धावली. त्यातून महामंडळाला ४७ कोटी ३८ लाख रुपये मिळाले.

तसेच एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान ६७ हजार ९४८ फेऱ्या झाल्या. एकूण ९० लाख ७२ हजार १८५ किलोमीटर गाडी धावली. त्यातून महामंडळाला ४३ कोटी ९५ लाख रुपये मिळाले. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान मालवाहतुकीच्या ३८ हजार ९४८ फेऱ्या झाल्या. एकूण गाडी ५२ लाख ७८ हजार १३६ किलोमीटर गाडी धावली. त्यातून महामंडळाला ३१ कोटी १६ लाख रुपये मिळाले.

तसेच एप्रिल २०२३ ते मे २०२३ दरम्यान ५ हजार ६३९ फेऱ्या झाल्या. एकूण ७ लाख ५० हजार ८६७ किलोमीटर गाडी धावली. त्यातून ५ कोटी १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकंदरीतच या तिन्ही वर्षाच्या कालावधीत एकूण १ लाख ९४ हजार २१९ फेऱ्या झाल्या. एकूण २ कोटी ६९ लाख ६० हजार ५९५ किलोमीटर गाडी धावली.

त्यातून महामंडळाला १२७ कोटी ५१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या दरम्यान मालवाहतुकीचा दर हा २०० किलोमीटर पर्यंत ५७ रुपये प्रति किलोमीटर होता. त्यापुढे ५५ रुपये प्रति किलोमीटर आहे. तर कमीत कमी ४ हजार ५०० रुपये भाडे एकेरी वाहतुकीसाठी आहे. याबाबतची माहिती अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारात मागितली होती. त्यास महामंडळाने सदर माहिती उत्तरात दिली.

बालभारतीच्या बुकिंगने एसटी मालामाल

मे २०२० ते मे २०२३ या तीन वर्षांच्या कालावधीत महामंडळाने बालभारतीची मालवाहतूक केली. याकरिता १ हजार ५६६ फेऱ्या झाल्या. एकूण २ लाख ६७ हजार ६३७ किलोमीटर वाहतूक करण्यात आली. त्यातून महामंडळाला २ कोटी १ लाख २५ हजार ८६ रुपयांचे उत्पन्न मिळाले. प्रति फेरी ही ९ ते १० टनाची आहे.

मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि लातूर या विभागात बालभारतीसोबत केलेल्या करारानुसार ही वाहतूक करण्यात आली असल्याची माहिती आरटीआय अंतर्गत देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT