11th Admission: esakal
महाराष्ट्र बातम्या

11th Admission: CBSE, ICSE विद्यार्थ्यांसाठी १० ते १५ टक्के जागा रिक्त ठेऊन ११वी प्रवेश प्रक्रिया राबवावी; शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना

सकाळ डिजिटल टीम

अकोला: दहावीचा निकाल लागल्यानंतर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११वी करीता प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे. यावेळी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कनिष्ठ व उच्च महाविद्यालय स्तरावर होणार आहे. याबाबतचे वेळापत्रक शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. सुचिता पाटेकर यांनी जाहीर केले आहे. सर्व प्रवेश शासन आरक्षणानुसार व गुणवत्तेनुसार होणार आहेत.

दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थी व पालकांची ११वी प्रवेशासाठी लगबग दिसून येत आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाने ११वी प्रवेशाचे वेळापत्र व सूचना जारी केल्या आहेत.

त्यानुसार शाखानिहाय प्रवेश देताना विद्यार्थ्यांना प्रवेश आवेदन पत्रांचे वाटप करण्यात यावे, शाखा निहाय प्रवेश देताना निर्धारित प्रवेश क्षमतेच्या अधीन राहून प्रवेश देण्यात यावे, इनटेक कॅपिसिटीपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास, अतिरिक्त विद्यार्थी झाल्यास पटपडताळणीमध्ये सदरचे प्रवेश किंवा जादा प्रवेश रद्द करण्यात येतील.

इयत्ता११वी प्रवेश प्रक्रिया दिलेल्या वेळापत्रकानुसार करण्यात यावी, प्रवेश देताना नियमानुसार आरक्षणाचे तंतोतंप पालन करावे, सीबीएसई व आयसीएसई बोर्डाची परीक्षा पास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या १० ते १५ टक्के जागा रिक्त ठेऊन ११वी प्रवेश प्रक्रिया रूबविण्यात यावी, या व इतर सूचना शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी विद्यालय, महाविद्यालयांना दिल्या आहेत.

असे आहे वेळापत्रक

१२ ते १६ जून : विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज वितरीत करणे व अर्ज स्वीकारणे.

१७ जून : अर्जांची छाननी करणे.

१९ जून : प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांची एकत्रित गुणवत्ता यादी व प्रवेश क्षमतेनुसार प्रत्यक्ष गुणवत्तेनुसार विहित आरक्षणाप्रमाणे संवर्गनिहाय स्वतंत्र यादी तयार करणे व सूचना फलकावर लावणे.

२० ते २२ जून : प्रवेश यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.

२३ जून : रिक्त जागेसाठी १ली प्रतीक्षा यादी लावणे.

२४ ते २६ जून : प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे.

२७ जून : दुसरी प्रतीक्षा यादी सूचना फलकावर लावणे व प्रवेश देणे.

२९ जून : दुसऱ्या प्रतीक्षा यादीचे प्रवेश करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT