महाराष्ट्र बातम्या

11वीची विशेष फेरीचे प्रवेश स्थगित, SEBC विद्यार्थ्यांना अर्जात बदल करण्यासाठी मुदतवाढ

तेजस वाघमारे

मुंबईः  एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार एसईबीसी विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस किंवा खुला प्रवर्ग निवडण्यासाठी अकरावी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. त्यानुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना प्रवर्ग निवडण्याची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. यामुळे अकरावीची विशेष फेरीचे महाविद्यालय ऑलॉटमेंट स्थगित करण्यात आले आहे. 

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत आहे. यंदा कोरोना आणि एसईबीसी आरक्षणाचा पेच निर्माण झाल्याने प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे. यातच आता राज्य सरकारने एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस किंवा खुला प्रवर्ग निवडण्यासाठी संधी देण्यात आली आहे. यासाठी अकरावी प्रवेशाची पहिली विशेष फेरी स्थगित करण्यात आली आहे. पहिल्या विशेष फेरीत विद्यार्थ्यांना देण्यात आलेले महाविद्यालयांचे ऑलॉटमेंट स्थगित करण्यात आले आहे. 

26 डिसेंबर सायंकाळी 5 पर्यत
एसईबीसी विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस किंवा जनरल प्रवर्ग निवडणे आणि अंडरटेकिंग अपलोड करणे. अर्जाचा भाग 1 भरून लॉक करणे आणि व्हेरिफाय करून घेणे. 
बदल करावयाचा नसल्यास फॉर्म पार्ट 1 अनलॉक करू नये. या कालावधीत इतर विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भाग 1 भरता येईल, त्यामध्ये बदल करता येईल. यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करता येईल आणि विशेष फेरीसाठी लगेच अर्ज सादर करता येईल. 

27 डिसेंबर रात्री 11:55 पर्यत 
प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे (भाग 2 भरणे व लॉक करणे) 
यापूर्वी ऑप्शन फॉर्म भरला असल्यास त्यामध्ये बदल करता येईल.

28 डिसेंबर 5 वाजता 
गुणवत्ता यादी जाहीर होणार आणि कट ऑफ संकेतस्थळवर प्रदर्शित होतील.

29 डिसेंबर ते 31 डिसेंबर सायंकाळी 6 पर्यत 
मिळलेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित करण्यासाठी कालावधी 

1 जानेवारी 
विशेष फेरी पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांचा तपशील जाहीर होणार.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

11th special application round postponed Extension for SEBC students

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT