eknath shinde  sakal
महाराष्ट्र बातम्या

12 MLC Maharashtra Case : राज्यपाल नियुक्त आमदारांचं प्रकरण पुन्हा हायकोर्टात; उद्या होणार सुनावणी

संतोष कानडे

मुंबईः राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण मागच्या तीन वर्षांपसून खितपत पडलेलं आहे. या प्रकरणी आता उद्या पुन्हा मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

जून २०२० पासून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचं प्रकरण पेंडिंग आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाच्या सुनावण्या झालेल्या आहेत. येत्या बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

कोर्टाच्या कचाट्यात सापडलेलं हे प्रकरण हायकोर्टात आलेलं आहे. या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते रतन सोली यांना याचिका मागे घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मुभा दिलेली होती. तर दुसरे याचिकाकर्ते सुनिल मोदी यांना हायकोर्टात पुन्हा दाद मागयची असेल तर मागा, असं कोर्टाने म्हटलं होतं.

त्यानुसार आता सुनिल मोदी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी उद्या होणार आहे. उद्या कोर्टात नेमकं काय होतंय, त्यावर १२ आमदारांच्या नियुक्तीचं भविष्य अवलंबून आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीच्या निर्णयावर बुधवारी सुनावणी होईल. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील सत्ता बदलानंतर याबाबत एक वेगळी याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आधीची यादी परत पाठवली. हे कृत्य नियमात बसणारं नाही, असं सांगत न्यायालयात आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आता त्यावर काय निर्णय येतो, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड अटकेत... २५ वर्षांपासून देशभरात चालवत होता रॅकेट, कोण आहे बिजेंद्र गुप्ता?

IND vs ZIM 2nd T20I: वैभव सुर्यवंशीची स्फोटक फलंदाजी आजही पाहायला मिळणार; भारत- झिम्बाब्वे दुसरा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Live Updates Marathi : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; धरणांतील पाणीसाठ्याने मागील वर्षाची सरासरी ओलांडली

नवी पिढी प्रश्न विचारणारी, लॉजिक जाणून घेणारी; आदेशाऐवजी...; सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले?

Heavy Rain Effects: गुजरातमध्ये पावसाचा धुमाकूळ कायम, आसाममध्ये गंभीर स्थिती, काश्‍मीरमध्येही हजेरी

SCROLL FOR NEXT