raosaheb danve sakal
महाराष्ट्र बातम्या

Raosaheb Danve : महाराष्ट्र राज्याला रेल्वे प्रकल्पांसाठी बारा हजार कोटींचा निधी

२०१४ पूर्वी महाराष्ट्राला अकराशे कोटी रूपये मिळत होती परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालू वर्षी राज्याला बारा हजार कोटी रूपये मिळाले आहेत.

प्रफुल्ल भंडारी

दौंड - २०१४ पूर्वी महाराष्ट्राला अकराशे कोटी रूपये मिळत होती परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालू वर्षी राज्याला बारा हजार कोटी रूपये मिळाले आहेत. त्यातून रेल्वेची अपूर्ण कामे पूर्ण करणे आणि नवीन कामे हाती घेऊन वेळेत पूर्ण केली जात आहेत, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी दिली.

दौंड रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे पाटील यांनी ही माहिती दिली. आमदार राहुल कुल, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे, शहराध्यक्ष स्वप्नील शहा, रेल्वेचे अधिकारी, आदी या वेळी उपस्थित होते.

रावासाहेब दानवे म्हणाले, २०१४ ते २०२३ या कालखंडात प्रलंबित रेल्वे प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि नवीन कामे हाती घेऊन ती वेळेत पूर्ण करण्यासाठी मोठा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. केंद्र व राज्य सरकारचे प्रत्येकी पन्नास टक्के भागीदारीतून राज्यातील रेल्वे प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली होती.

परंतु मधल्या काळात आमचे सरकार नव्हते त्यामुळे निधी अभावी कामे थांबली होती. परंतु आता राज्य सरकारने त्यांचा हिस्सा उपलब्ध करून दिल्याने कामे मार्गी लागली आहेत. अमृत भारत स्थानक विकास योजनांतर्गत देशभरातील १३०९ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे.

रावसाहेब दानवे यांनी दौंड-पुणे-दौंड असा दैनंदिन प्रवास करणार्या प्रवाशांचे प्रतिनिधी, नागरिक, लोकप्रतिनिधी व भाजप पदाधिकाऱ्यांच्या मागण्या व सूचना या वेळी स्वतंत्रपणे ऐकून घेत त्या बाबत बैठक बोलविण्याची ग्वाही दिली.

दौंड कार शेडचे काम मे पर्यंत पूर्ण होईल

दौंड-सिध्दटेक मार्गालगत असलेल्या रेल्वे इलेक्ट्रिक कार शेडच्या कामाची रावसाहेब दानवे यांनी पाहणी केली. सुमारे १५० कोटी रूपयांचा या प्रकल्पात रेल्वेच्या विद्युत इंजिनची अत्याधुनिक पध्दतीने देखभाल व दुरूस्ती होणार आहे. सदर काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. या कार शेड मुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास श्री. दानवे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT