jandhan yojana sakal
महाराष्ट्र बातम्या

‘जनधन’ खात्यात १२०५१ कोटी; खातेदारांना आता १० हजारांचा ओव्हरड्राफ्ट, पण कसा? जाणून घ्या निकष...

राज्यातील सव्वातीन कोटी महिला व पुरुषांनी शून्य रुपयात जनधन खाती उघडली आहेत. मागील चार वर्षांत त्या खात्यांमधील रक्कम तब्बल चार हजार ५८५ कोटी रुपयांनी वाढली आहे. आता या खातेदारांना केंद्र सरकारने ‘दहा हजारांचा ओव्हरड्राफ्ट’ देण्याचा निर्णय घेतला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील सव्वातीन कोटी महिला व पुरुषांनी शून्य रुपयात जनधन खाती उघडली आहेत. मागील चार वर्षांत त्या खात्यांमधील रक्कम तब्बल चार हजार ५८५ कोटी रुपयांनी वाढली आहे. आता या खातेदारांना केंद्र सरकारने ‘दहा हजारांचा ओव्हरड्राफ्ट’ देण्याचा निर्णय घेतला आहे.

बॅंकिंग व्यवहारापासून वर्षानुवर्षे दूर राहिलेल्यांना विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना बचतीची सवय लागावी, बॅंकिंग व्यवहार त्यांनाही समजावेत, वित्तीय साक्षरता यावी, अटल पेन्शन योजना व प्रधानमंत्री अपघात विमा योजनांसह अन्य शासकीय योजनांचा लाभ बॅंकांच्या माध्यमातून थेट मिळावा, या हेतूने १५ ऑगस्ट २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जनधन’ योजना सुरु केली.

आतापर्यंत राज्यातील तीन कोटी २४ लाख व्यक्तींनी शून्य रूपयात जनधन खाते उघडले आहे. केंद्र असो वा राज्य सरकारच्या योजनांचा डीबीटीद्वारे (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) त्या व्यक्तींना जनधन खात्यात अनुदानाच्या स्वरुपात लाभ मिळू लागला आहे.

सध्या पुरुषांच्या तुलनेत महिलांचीच खाती ‘जनधन’मध्ये अधिक आहेत. विशेष बाब म्हणजे मार्च २०२० मध्ये राज्यातील पावणेतीन कोटी जनधन खात्यात सात हजार ४६४ कोटी रुपये होते. आता कोरोनाच्या संकटानंतरही मार्च २०२३ पर्यंत जनधन खात्यांतील रक्कम १२ हजार ५१ कोटींवर पोहचली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे एकूण खात्यातील २८ ते ३० लाख खात्यात एक रुपयादेखील नाही.

‘जनधन’ ओव्हरड्राफ्टचे निकष...

  • - जनधनचे खाते किमान सहा महिन्यापूर्वीचे जुने असावे

  • - सहा महिन्यात जेवढी रक्कम खात्यात जमा होईल, त्याच्या ५० टक्के ओव्हरड्राफ्ट (१० हजारांपर्यंतच)

  • - ओव्हरड्राफ्टवर वार्षिक १२ टक्के व्याज; एका दिवसालाही लागणार व्याज

  • - खातेधारकाचे वय १८ ते ६५ पाहिजे; बॅंक खात्याला आधार व मोबाईल लिंक केलेला असावा

  • - खाते नियमित सुरु असावे आणि दरमहा त्यात काहीतरी रकमेचा भरणा पाहिजे

  • - महिन्याच्या सरासरी रकमेच्या चारपट ओव्हरड्राफ्ट मिळणार; दरमहा किमान दोन-अडीच हजार भरणे अपेक्षित

  • - खात्यातील रक्कम दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास व्याज लागत नाही

सोलापूर जिल्ह्याची स्थिती

  • महिलांची खाती

  • ८,२४,९९६

  • पुरुषांची खाती

  • ६,२४,९७१

  • एकूण खाती

  • १४,५०,२६१

  • जनधन खात्यातील रक्कम

  • ५३९.१२ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT