Rain 
महाराष्ट्र बातम्या

ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पाऊस

अमोल कुटे

पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात राज्यात यंदा दमदार पावसाची नोंद झाली. अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनने आणि परतल्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाने राज्याला चांगलाच दणका दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात १६१.६ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. 

आगमनाप्रमाणेच मॉन्सूनचा परतीचा प्रवास आत्तापर्यंतच्या सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत परतीच्या मॉन्सूनने देशाचा निरोप घेतला. मॉन्सून परतल्यानंतरही मॉन्सूनोत्तर पावसाने राज्यभर दाणादाण उडवून दिली. दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात तर पावसाने अक्षरशः थैमान घातले. कोकण, मध्य महाराष्ट्रालाही पावसाने धुऊन काढले. पावसाचे प्रमाण प्रचंड असलेल्याने दुष्काळी भागातील नद्या वाहत्या झाल्या.

या कोरडवाहू भागातील अनेक नद्यांना कित्येक वर्षांना मोठे पूर आले. पुराचे पाणी शेतात, गावात शिरून नुकसान झाले. पावसाळा संपल्यानंतर मराठवाड्यातील धरणे, तलाव, बंधारे ओसंडून वाहिले. पश्चिम विदर्भाच्या काही भागात कोसळणार पावसाने पूर्व विदर्भात मात्र उसंत घेतली. विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT