Diksha Shinde  ANI
महाराष्ट्र बातम्या

औरंगाबादच्या 14 वर्षांच्या लेकीची 'नासा'च्या पॅनलमध्ये निवड

तिने जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांची अनेक पुस्तके वाचली आहेत. याच पुस्तकातून प्रेरणा घेत तिने या क्षेत्रात पाउल टाकले आहे.

सुशांत जाधव

महाराष्ट्रातील औरंगाबादमधील दीक्षा शिंदे या 14 वर्षांच्या मुलीने देशाच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवलाय. नासाच्या पॅनेलमध्ये (NASA's MSI Fellowships Virtual Panel) तिची नियुक्ती झालीये. या मोठ्या यशानंतर दीक्षाने एएनआयशी संवाद साधला. तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाल्याची माहिती तिने यावेळी दिली. कृष्णविवर (Black hole) आणि देव (God) यासंदर्भात अभ्यास करत होते, अशी माहिती तिने दिली. तिच्या शास्त्रीय दृष्टिकोनातील लेखनाला आता नासाच्या वेबसाइटवर प्रसिद्धी मिळणार आहे.

दीक्षाने एका इंग्लिश माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, तिने जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांची अनेक पुस्तके वाचली आहेत. याच पुस्तकातून प्रेरणा घेत तिने सर्वात प्रथम 'Questioning Existence Of God' लेख लिहिला होता. सप्टेंबर 2020 मध्ये तिने दिलेला लेख नाकारण्यात आला. त्यानंतर तिने पुन्हा ऑक्टोबरमध्ये लेख सादर केला तोही नाकारण्यात आला.

या घटनेनंतर निराश न होता तिने डिसेंबरमध्ये पुन्हा रिसर्च करुन कृष्णविवर (Black hole) संदर्भात लेख लिहिला. नासाने तिचा हा लेख स्विकारला आणि तिला 3 महिन्यांची स्कॉलशिप मिळाली. मार्च ते जून या तीन महिन्यांसाठी नासाकडून तिला प्रति माह 50,000 रुपये स्टायपंड स्वरुपात मिळाले. त्यानंतर तिला नासासोबत काम करण्याची संधी चालून आलीये. तिने नासाची ऑफर स्विकारली असून जूनपासून ती नासाच्या पॅनेलमध्ये (NASA's MSI Fellowships Virtual Panel) काम करणार आहे. दीक्षाचे वडील कृष्णा शिंदे हे एका शाळेवर मुख्याध्यापक आहेत. तिची आई रंजना शिंदे या घरीच असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll: ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये कोण बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Kolhapur Corporation Exit Poll : सतेज पाटील बालेकिल्ला राखणार का?, कोल्हापुरात कोणाची सत्ता; एक्झिट पोल आला समोर

Akola Election Analysis : अकोला महापालिकेत कुणाला मिळेल ‘लाडक्या बहिणींची’ साथ? भाजपासह राष्ट्रवादी-शिंदेसेनेची प्रतिष्ठा पणाला!

Highway Emergency Helpline : ‘हायवे’वर गाडी बंद पडली, पेट्रोल संपलं चिंता नाही; फक्त एक फोन करा अन् तुमचं काम झालं!

Bangladesh Cricket: खेळाडूंचं बंड, तुफान राडा, तोडफोड अन्...; बांगालेदश प्रीमिअर लीग अनिश्चित काळासाठी स्थगित Video

SCROLL FOR NEXT