Anganwadi Bharti 2023 esakal
महाराष्ट्र बातम्या

Anganwadi Bharti 2023: अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला १५ दिवसांची मुदत! १० मार्चनंतर ‘इथे’ करा अर्ज

राज्यातील अंगणवाड्यांमध्ये ३० हजारांहून अधिक मदतनीस व सेविकांची भरती सुरु आहे. सुरवातीला पदोन्नती पूर्ण केली जात आहे. १० मार्चनंतर सेविका, मदतनीस होऊ इच्छिणाऱ्या महिला व तरूणींसाठी अर्ज उपलब्ध होणार आहेत. साधारणत: अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे.

तात्या लांडगे

Solapur News : राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये ३० हजारांहून अधिक मदतनीस व सेविकांची भरती सध्या सुरु आहे. सुरवातीला पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. १० मार्चनंतर नव्याने सेविका, मदतनीस होऊ इच्छिणाऱ्या महिला व तरूणींसाठी अर्ज उपलब्ध होणार आहेत. साधारणत: अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे.

यंदा प्रथमच सेविका पदासाठी बारावी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. सात-आठ वर्षांनी पदभरती होत असल्याने अनेक उच्चशिक्षित देखील वर्ग- तीन व वर्ग-चार या संवर्गातून शासकीय नोकरीसाठी अर्ज करीत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरतीत मोठी रस्सीखेच पहायला मिळणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात सेविकांची २३६ तर मदतनीसांची २६४ पदे रिक्त आहेत. मिनी अंगणवाड्यांवर ५५ सेविकाची भरती केली जाणार आहे. सध्या जवळपास ९० मदतनीस महिलांना पदोन्नती देण्याची कार्यवाही सुरु आहे. १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० मार्चपासून नवीन पदांसाठी अर्ज भरून घेतले जाणार आहेत.

तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बालकल्याण समितीच्या कार्यालयातूनच अर्ज उपलब्ध होणार आहेत. १५ दिवसांत संपूर्ण कागदपत्रांसह (शैक्षणिक पात्रतेसह इतर) अर्ज त्याच ठिकाणी आणून द्यावा लागणार आहे.

त्यानंतर बालकल्याण अधिकारी अर्जांची छाननी करेल आणि त्यानंतर मेरिटनुसार यादी प्रसिध्द होईल. शेजारील तालुक्यातील बालकल्याण अधिकारी त्या यादीची पडताळणी करतील. निवड झालेल्या नावांवर आक्षेप घेण्यासाठी काही दिवसांचा कालावधी असणार आहे. त्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

७४० अंगणवाड्यांमध्ये वाढणार पदे

जिल्ह्यातील ७४० मिनी अंगणवाड्यांचे रुपांतर मोठ्या अंगणवाड्यांमध्ये करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा परिषदेने राज्याच्या महिला व बालविकास विभागाला पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यात आणखी ७४० पदे वाढणार आहेत.

तसेच मिनी अंगणवाड्यांमधील सेविकांचे मानधन देखील वाढणार आहे. सध्या मिनी अंगणवाड्यांमधील सेविकांना दरमहा पाच हजार ६७५ रुपयांचे मानधन दिले जाते.

तर मोठ्या अंगणवाड्यांमधील सेविकांना आठ हजार ३२५ रुपये आणि मदतनीस असलेल्यांना चार हजार ४२५ रुपये मानधन मिळते. त्यात वाढ करण्याचा निर्णय नवीन आर्थिक वर्षात होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Price Hike Pune : वाहनधारकांच्या खिशाला कात्री! पुणे, चाकण, पिंपरी-चिंचवड, तळेगावसह हिंजवडीत CNG महागला; मध्यरात्रीपासून 'एवढ्या' रुपयांची दरवाढ लागू

DC vs KKR Live: ५१ चेंडूंवर एकही धाव नाही! दिल्ली कॅपिटल्सची लाजीरवाणी खेळी; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी आवळला फास

Latest Marathi News Update : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Suvendu Adhikari : भीती संपली, आता विश्वासाचं युग! मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच सुवेंदू अधिकारींनी फुंकलं रणशिंग; म्हणाले, 'मोदींनी सांगितल्याप्रमाणे बंगालमध्ये...'

Pune News : रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

SCROLL FOR NEXT