कोरोना चाचणी Esakal
महाराष्ट्र बातम्या

सकारात्मक बातमी! 15 जिल्ह्यातील कोरोना रुग्ण 100 च्या आत

नामदेव कुंभार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात कमी झाल्याचं दिसत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील आकडेवारी सकारात्मक आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णाची संख्या कमी होऊन 53 हजारांवर आली आहे. राज्यातील 15 जिल्ह्यात 100 पेक्षा कमी उपचाराधीन रुग्ण आहेत. नंदुरबारमध्ये तर एकही कोरोनाचा रुग्ण नाही. रुग्णसंख्या नियंत्रणात दिसत असली तरी नवे बाधित रुग्ण पूर्णपणे संपलेले नाहीत. येणाऱ्या नवीन रुग्णांमध्ये अनेक रुग्ण रुग्णालयात उशिरा दाखल होतात

राज्यातील एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी 37 हजार रुग्ण पाच जिल्ह्यातील आहेत. या पाच जिल्ह्यांमध्ये पुणे, ठाणे, सातारा, अहमदनगर आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये सरासरी तीन हजार पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्णांची नोंद आहे.

15 जिल्ह्यातील कोरोना रुग्ण 100 च्या आत

जळगाव, नंदुरबार, धुळे, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

पाच जिल्ह्यात मृत्यु नाही -

राज्यातील मृत्यूदर आटोक्यात आलेला नाही, असे असतानाच पाच जिल्हयातून सकारात्मक बातमी समोर आली आहे. महिनाभरापासून पाच जिल्ह्यात एकही मृत्यू झालेला नाही. धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यात महिनाभरापासून एकाही मृत्यूची नोंद नाही.

महाराष्ट्राची कोरोना आकडेवारी

राज्यात 4 हजार 575 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. नवीन 5 हजार 914 बाधित रुग्ण बरे झालेत. एकूण 62 लाख 27 हजार 219 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 53 हजार 967 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.99% झाले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणमध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी करीत 10 लाख 96 हजार नागरिकांना लस दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची माहिती दिली.

लसीकरणात महाराष्ट्राचा विक्रम

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत 10 लाख 96 हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे 11 लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने अतुलनीय कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT