maharashtra sakal
महाराष्ट्र बातम्या

कर्जदाराच्या वारसाला 31 वर्षांनी मिळाले 15 तोळ्याचे दागिने! जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून खाली उतरले अन्‌ वारसांच्या डोळ्यात तरळले अश्रू

सोलापुरातील उद्योग विश्‍वाला भरारी देणारी बँक म्हणून एकेकाळी सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेची ओळख होती. नंतर ही बँक २०११ पासून अवसायनात गेली. या बँकेतून १९९३ मध्ये सोने तारण कर्ज काढलेल्या कर्जदारांच्या वारसांनी थकबाकीचे २ हजार २७८ रुपये जमा केल्याने वारसांना अंदाजे १५ तोळे सोने परत मिळाले आहे.

प्रमोद बोडके -सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापुरातील उद्योग विश्‍वाला भरारी देणारी बँक म्हणून एकेकाळी सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेची ओळख होती. नंतर ही बँक २०११ पासून अवसायनात गेली. या बँकेतून १९९३ मध्ये सोने तारण कर्ज काढलेल्या कर्जदारांच्या वारसांनी थकबाकीचे २ हजार २७८ रुपये जमा केल्याने वारसांना अंदाजे १५ तोळे सोने परत मिळाले आहे. या दागिन्यांना सध्या लाखमोलाचा भाव असला तरीही मृत बहिणीची आठवण ३१ वर्षांनी परत मिळाली म्हणून ८० वर्षीय वारस बहिण खतिजाबी दादावली शेख व जिनतुन्निसा बेगम खुदाबक्ष जहागीरदार यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

सोलापूर नागरी औद्योगिक बँकेतून १९९३ मध्ये सौ. शाबेरा दादावली देशमुख (शेख) यांनी सोने तारण कर्ज घेतले होते. शिक्षिका व शिकवणीचे काम करणाऱ्या शेख यांनी त्यांच्याकडील सोने बँकेत गहाण ठेवले होते. ही बँक २०११ मध्ये अवसायनात आली, नंतरच्या काळात कर्जदार सौ. शाबेरा दादावली देशमुख (शेख) यांचाही मृत्यू झाला. आपल्या बहिणीची आठवण आपल्याकडे असावी म्हणून तिचे दागिने मिळविण्यासाठी खतिजाबी दादावली शेख व जिनतुन्निसा बेगम खुदाबक्ष जहागीरदार या वयोवृद्ध महिलांनी बँकेकडे पाठपुरावा केला. न्यायालयानेही सौ. शाबेरा दादावली देशमुख (शेख) यांच्या वारस म्हणून खतिजाबी दादावली शेख व जिनतुन्निसा बेगम खुदाबक्ष जहागीरदार यांना निश्‍चित केले होते. या प्रकरणात बँकेचे अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी अधिकाऱ्यातील माणुसकीचे दर्शन दाखवत या वारसांना तारणातील सोने परत देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली.

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास खतिजाबी दादावली शेख व जिनतुन्निसा बेगम खुदाबक्ष जहागीरदार या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आल्या होत्या. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात त्यांना आरोग्याच्या कारणास्तव येता येत नव्हते. जिल्हा उपनिबंधक गायकवाड हे सर्व कागदपत्र व दागिने घेऊन स्वत: त्यांच्या वाहनाजवळ आले. आवश्‍यक ती प्रक्रिया पूर्ण करून त्या वारसांकडे गायकवाड यांनी दागिने सुपूर्द केले. यावेळी सहायक निबंधक गावडे आबासाहेब, उमेश पवार, कार्यालय अधीक्षक के. के. कंकाळ, ए. आर. वर्देकर, आर. एन. ढोणे, बँकेचे वसुली अधिकारी एन. टी. कैरमकोंडा, बँक अधिकारी एस. आर. इराबत्ती आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st Test: रचिन रवींद्रला DRS अभावी जीवदान, पण अखेर OUT! डॅरिल मिचेलचाही जैस्वालने घेतला भारी कॅच; लंचपर्यंत भारताचं वर्चस्व

MS Dhoni Retirement: "मी गांगुलीला तेव्हाच सांगितलेलं..." सचिन तेंडुलकरने धोनीबद्दलचा सांगितला जुना किस्सा; खास पोस्ट चर्चेत

Maharashtra Wage Rules: सुट्टीच्या दिवशी काम केल्यास मिळणार दुप्पट पैसे? महाराष्ट्रातील नव्या वेतन नियमांत काय?

IND vs NZ, 1st Test: बुम बुम बुमराह! तिसऱ्याच बॉलवर न्यूझीलंडच्या कर्णधाराला केलं क्लिन बोल्ड, दोन्ही ओपनर बाद; Video

Motherhood and Career: आई झाल्यानंतर पुन्हा ऑफिसला जाताय? कामावर परतताना महिलांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवा; डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT