शिक्षा esakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

बालविवाह कायद्याने गुन्हा असताना देखील सोलापूर जिल्ह्यात बालविवाह करण्याचे प्रमाण लक्षणीय आढळते. जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे आलेल्या तक्रारींवरून बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी १ एप्रिल २०२४ ते ३१ जुलै २०२५ या दीड वर्षात तब्बल १५१ बालविवाह रोखले आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : बालविवाह कायद्याने गुन्हा असताना देखील सोलापूर जिल्ह्यात बालविवाह करण्याचे प्रमाण लक्षणीय आढळते. जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे आलेल्या तक्रारींवरून बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी १ एप्रिल २०२४ ते ३१ जुलै २०२५ या दीड वर्षात तब्बल १५१ बालविवाह रोखले आहेत. करमाळा, मोहोळ, अक्कलकोट, मंगळवेढा या तालुक्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे.

१८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यासही अशीच शिक्षा आहे. बालविवाह झाल्यास, संबंधित वर वा वधू यांचे आई-वडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत किंवा जे अशा विवाहात सामील झाले होते, अशा सर्वांना या गुन्ह्यात दोषी धरले जाते.

मात्र, अशा सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे. अनेकदा त्या गावातील स्थानिक नेते अशा विवाहात उपस्थित असतात. कारवाईवेळी नेतेमंडळींकडून हस्तक्षेप होतो, असे अधिकाऱ्यांचे अनुभव आहेत. बालविवाह प्रकरणी मागील वर्षी १८ तर यंदा तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गतवर्षी मे, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात तर यंदा एप्रिल, मे, जून महिन्यात सर्वाधिक बालविवाह रोखण्यात आले आहेत.

अधिकारी म्हणतात...

बालविवाह झालेल्या मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो. १८ वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच गर्भधारणा झाल्यास बाळाच्या पोषणासाठी अजिबात सक्षम नसलेले शरीर, घरातील कामाचे ओझे, त्यातच अपुरे पोषण, या साऱ्यांचा वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर होतो. बालविवाहामुळे लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते. कुटुंब नियोजन, गर्भधारणा आणि गर्भारपणात घ्यायची काळजी, यापासूनही त्या अनभिज्ञ असतात. त्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बालविवाह करून पालकांनी मुलींचे आयुष्य बरबाद करू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर यांनी केले आहे.

उन्हाळा सुटीत बालविवाह अधिक

शाळा- महाविद्यालयांना मे महिन्यात उन्हाळा सुटी असते. या महिन्यात लग्नसराई असल्याने विवाहाचे मुहुर्त अधिक असतात. २०२४ व २०२५ या दोन्ही वर्षातील मे महिन्यात अन्य महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक बालविवाह रोखले गेले आहेत. मे २०२४ मध्ये १४ आणि मे २०२५ मध्ये १५ बालविवाह रोखले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT