sakal-exclusive sakal
महाराष्ट्र बातम्या

३०००० शिक्षक भरतीसाठी १.५३ लाख उमेदवार! १३ जिल्ह्यांचीच बिंदुनामावली अंतिम; भरतीला पूर्ण व्हायला नोव्हेंबर उजाडणार

आतापर्यंत एक लाख ५३ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. २२ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत असून पुढील आठवड्यात बिंदुनामावली अंतिम झालेल्या जिल्हा परिषदांकडून रिक्त पदांची माहिती ‘पवित्र’वर अपलोड होईल. सद्य:स्थितीत एका जागेसाठी पाच उमेदवार नोकरीच्या स्पर्धेत आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील ६३ हजार जिल्हा परिषद शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये २३ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यासाठी सध्या उमेदवारांची नोंदणी सुरु असून आतापर्यंत एक लाख ५३ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. २२ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत असून पुढील आठवड्यात बिंदुनामावली अंतिम झालेल्या जिल्हा परिषदांकडून रिक्त पदांची माहिती ‘पवित्र’वर अपलोड होईल. सद्य:स्थितीत एका जागेसाठी पाच उमेदवार नोकरीच्या स्पर्धेत आहेत.

जिल्हा परिषदांनी प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक पदांची अंतिम केलेली बिंदुनामावली सध्या मागासवर्गीय कक्षाकडून पडताळून घेतली जात आहे. प्रत्येक पदांची पडताळणी करून त्याठिकाणी अंतिम मान्यता दिली जाते. आतापर्यंत राज्यातील १३ जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मान्य झाली असून आगामी आठ दिवसात आणखी सात-आठ जिल्हे त्यात वाढतील. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील भरती प्रक्रिया सुरु होईल.

दरम्यान, नोंदणीनंतर प्रत्येक उमेदवाराला त्यांच्याकडील कागदपत्रे अपलोड करून प्रोफाईल तयार करून घ्यावे लागत आहे. नोंदणी केलेल्या जवळपास ३० हजार उमेदवारांचे प्रोफाईल अद्याप तयार झालेले नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जाहिरातीतील जातप्रवर्गनिहाय उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होऊन मेरिटनुसार भरती होईल. दुसरीकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील एका पदासाठी तिघांची मुलाखत घेतली जाईल आणि ते उमेदवार शालेय शिक्षण विभाग पवित्र पोर्टलवरूनच त्याठिकाणी पाठविणार आहे.

आता नोव्हेंबरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवरील शिक्षक भरती पूर्ण होईल. त्याचवेळी खासगी माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षक भरती होणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी, त्या शाळांनी बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेणे आवश्यक आहे.

शिक्षक भरतीची सद्य:स्थिती

  • स्थानिक संस्थांमधील भरती

  • २३,०००

  • उमेदवारांची नोंदणी

  • १.५३ लाख

  • नोंदणीची मुदत

  • २२ सप्टेंबर

  • बिंदुनामावली पूर्ण

  • १३ जिल्हे

‘माध्यमिक’च्या भरतीला मुहूर्त नाहीच

जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरतीला पहिले प्राधान्य दिले जात आहे. जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून पडताळून घेतली जात आहे. पण, अनुदानित माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमधील भरती प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही. बिंदुनामावली अपूर्ण असल्याने खासगी अनुदानित शाळांची भरती लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: 'श्रेयस अय्यर -गंभीरला काढून टाकण्यापेक्षा जरा विचार करा आणि IPL... ', संजय मांजरेकरांची BCCI वर सडकून टीका

Ishwarpur Municipality Politics : गाफील जयंतराव युतीच्या खिंडीत अडकले; जयंत पाटील यांचा 'आनंद' अल्पजीवी ठरला, मुरब्बी राजकारणी कसा राहिला गाफील?

Beed: एटीएमचा स्लॅब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

Kolhapur Police Raid : मुंबई-पुण्यातून आणल्या जायच्या महिला; व्हॉट्सॲप ग्रुप करून वाशीतील लॉजमध्ये सुरू होता वेश्‍याव्यवसाय, हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश

Smartphone Survey: स्क्रीन फुटली,फोन बदलला! ५३% भारतीयांनी खरेदी केला नवीन फोन!

SCROLL FOR NEXT