Rahul Narwekar esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Narwekar: अपात्र आमदारांचं काय होणार? मुंबईत पोहचताच नार्वेकरांनी दिले स्पष्ट संकेत

रुपेश नामदास

सुप्रीम कोर्टाने सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा निकाल आता विधानसभेचेअध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून ब्रिटनच्या दौऱ्यावर होते. ते आज मुंबईत परतले आहेत.

यासंदर्भात बोलताना राहुल नार्वेकरांनी आपली भूमिका मांडली. आज ते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी विमानतळावरून माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निकालवर आम्ही लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहोत. याची प्रक्रिया किचकट आहे.

हा निर्णय पुर्ण चौकशी केल्यानंतरच कायद्याच्या तरतुदीनुसार निर्णय घेतला जाणार आहे, कोणत्याही प्रकारची घाई केली जाणार नाही, आणि उशीर देखील केला जाणार नाही. आपण सगळ्यांनी आश्वासित रहा जो निर्णय घेतला जाईल तो कायद्याच्या तरतुदीनुसार आणि सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार योग्य निर्णय घेवू अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल  नार्वेकर  यांनी दिली आहे.

मागील काही दिवसांपुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं होतं की, विधानसभा अध्यक्षांवर दबाव निर्माण केला जात आहे. त्यावर राहुल नार्वेकर म्हणाले की, सभागृहाच्या बाहेर केलेल्या वक्तव्यावर मी बोलणार नाही. मी त्याकडेलक्ष देत नाही. कायद्याच्या तरतुदी नुसार निकाल घेतला जाईल.

तर पुढे ते म्हणाले की, 'मी कोणाच्या मनाप्रमाणे व्हावं म्हणून मी निर्णय घेणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतले जातील. कोणाला वाटतं असेल लवकर निर्णय यावा म्हणून आम्ही निर्णय देऊ शकत नाही. प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण झाली तर लगेच निर्णय येईल. विनाकारण विलंब होणार नाही, 10वं शेड्यूल लक्षात घेऊनच निर्णय घेणार असल्याचं नार्वेकर म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT