ujani dam solapur
महाराष्ट्र बातम्या

उजनीचे १६ दरवाजे एक मीटरने उघडले! पंढरपुरातील जुना दगडी पूल पाण्याखाली; भीमा नदीत ५१ हजार क्युसेकचा विसर्ग; उजनीत आताच ऑगस्टअखेर इतका पाणीसाठा

दौंडवरून उजनीत येणारा विसर्ग कमी झाल्याने भीमा नदीतील पाणी बंद करण्यात आले होते, पण मागील चार-पाच दिवसांत पावसाला पुन्हा सुरवात झाल्याने आता उजनीचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. सध्या उजनीचे १६ दरवाजे एक मीटरने उघडले असून धरणातून ५० हजारांवर विसर्ग नदीत सोडला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : उजनीत सध्या दौंडवरून उजनीत सध्या ४१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे. धरण ९७ टक्क्यांपर्यंत भरल्याने भीमा नदीत पाणी सोडल्यामुळे पंढरपुरातील जुना दगडी पूल सध्या पाण्याखाली गेला आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यात हवामान खात्याने आज (रविवारी) रेड अलर्ट सांगितला आहे. त्यामुळे दौंडवरून येणारा विसर्ग वाढल्यास उजनीतून भीमा नदीतील विसर्ग आणखी वाढविला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दौंडवरून उजनीत येणारा विसर्ग कमी झाल्याने भीमा नदीतील पाणी बंद करण्यात आले होते, पण मागील चार-पाच दिवसांत पावसाला पुन्हा सुरवात झाल्याने आता उजनीचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. सध्या उजनीचे १६ दरवाजे एक मीटरने उघडले असून धरणातून ५० हजारांवर विसर्ग नदीत सोडला आहे. याशिवाय बोगद्यातून ४०० क्युसेक, कालव्यातून ११०० क्युसेक, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून २६० क्युसेक आणि धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी १६०० क्युसेक पाणी सोडले आहे. शुक्रवारी पहिल्यांदा भीमा नदीत पाच हजार क्युसेक पाणी सोडले आणि रविवारी सकाळी तो विसर्ग ५० हजार करण्यात आला आहे. वीर धरण ९५ टक्के भरल्याने सध्या वीरमधून नदीतून १४ हजार ६२७ क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

महिन्यात उजनीतून सोडले ३९ टीएमसी पाणी

२६ मे रोजी उणे पातळीतून प्लसमध्ये आलेल्या उजनीत सध्या ऑगस्टअखेर जेवढा पाणीसाठा अपेक्षित आहेत, तेवढे पाणी आहे. २० जूनपासून उजनीतून भीमा नदीद्वारे पाणी सोडण्यास सुरवात झाली. आता उजनीत ९७.१४ टक्के (११५.७२ टीएमसी) पाणीसाठा असून २० जून ते २७ जुलैपर्यंत धरणातून ३९ टीएमसी पाणी सोडून देण्यात आल्याची माहिती धरण व्यवस्थापन विभागाने दिली.

पंढरपूरला १.१६ लाख क्युसेकनंतर पुराचा धोका

भीमा नदी पात्रात एक लाख क्युसेकपर्यंत विसर्ग मावतो. एक लाख १६ हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत झाल्यावर पंढरपूरला पुराचा धाको संभवतो. सध्याच्या विसर्गात पंढरपुरातील जुना दगडी पूल पाण्याखाली जातो, अशी माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिली. तरीपण, नदी काठावरील सर्वांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक बाबी...

  • उजनीत दौंडवरून ४५ हजार तर वीरमध्ये १७ हजार क्युसेकची आवक

  • उजनीत ऑगस्टअखेर ९६ टक्के पाणीसाठा अपेक्षित, पण सध्या धरण ९७.१४ टक्के भरले

  • उजनीतून सोडलेले पाणी उद्या (सोमवारी) सकाळी नऊपर्यंत पोचणार, नदी काठावर सतर्कतेचा इशारा

  • आज (रविवारी) मध्यरात्री पंढरीतील जुना दगडी पूल पाण्याखाली

  • दौंडवरून येणारा विसर्ग वाढल्याने उजनीचे १६ दरवाजे एक मीटरने उघडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT