Sugar Production sakal
महाराष्ट्र बातम्या

Sugar Production : राज्यात १६३.५६ लाख क्विंटल साखर उत्पादन

राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी मिळून यंदाच्या ऊस गळीत हंगामात आजअखेरपर्यंत (ता. ६) एकूण २०४.४४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी मिळून यंदाच्या ऊस गळीत हंगामात आजअखेरपर्यंत (ता. ६) एकूण २०४.४४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. या गाळपातून आतापर्यंत १६३.५६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

गतवर्षीच्या आजअखेर पर्यंतच्या साखर उत्पादनाच्या तुलनेत यंदा ८३ हजार क्विंटलने कमी साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी आजअखेरपर्यंत २४६.५४ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते.

यंदाच्या गळीत हंगामात एकूण १८० साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरु केले आहे. यामध्ये ८८ सहकारी आणि ९२ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. दरम्यान, यंदाच्या गळीत हंगामात साखर उताराही कमी झाला आहे. राज्याचा सध्याचा सरासरी साखर उतारा हा ८ टक्के इतका आहे. गतवर्षी हाच साखर उतारा हा ८.८७ टक्के इतका होता.

यावरून यंदा साखर उताऱ्यात ०.८७ टक्क्यांनी घट झाली असल्याचे दिसून आले आहे. साखर आयुक्तालयाच्या वतीने आज यंदाच्या ऊस गळीत हंगामाची सद्यःस्थिती दर्शविणारा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.

राज्यात सर्वाधिक ३९ लाख १३ हजार क्विंटल साखर उत्पादन हे पुणे विभागात झाले असून, सर्वात कमी म्हणजे केवळ १ लाख ६३ हजार क्विंटल साखर उत्पादन हे अमरावती विभागात झाले आहे. साखर उताऱ्याच्या टक्केवारीत कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली असून, येथील साखर उताऱ्याची टक्केवारी सर्वाधिक ८.९५ टक्के इतकी आहे. छत्रपती संभाजीनगर (पूर्वाश्रमीचे औरंगाबाद) विभागातील साखर उताऱ्याची टक्केवारी ही सर्वात कमी म्हणजे केवळ ६.८३ टक्के इतकी आहे.

आतापर्यंत ऊस गाळप सुरु केलेल्या एकूण कारखान्यांमध्ये कोल्हापूर विभागातील ३२, पुणे विभागातील २७, सोलापूर विभागातील ४४, नगर विभागातील २४, छत्रपती संभाजीनगर विभागातील २२, नांदेड विभागातील २८, अमरावती विभागातील दोन आणि नागपूर विभागातील एका साखर कारखान्याचा समावेश आहे.

विभागनिहाय झालेले साखर उत्पादन (क्विंटलमध्ये)

- कोल्हापूर --- ३२.४६ लाख

- पुणे --- ३९.१३ लाख

- सोलापूर --- ३४.९५ लाख

- नगर --- २१.९९ लाख

- छत्रपती संभाजीनगर --- १३.३९ लाख

- नांदेड --- २०.०१ लाख

- अमरावती --- १.६३ लाख

- नागपूर --- शून्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

Blinkit-Zeptoवरून ५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झटका; Online खरेदीवर मर्यादा...

Marathi News Live Updates : 'लाडक्या बहिणींना' नागपूर महानगर पालिकेतर्फे रक्षाबंधनाची भेट

Mumbai Local: पार्किंगची फेररचना, नायगाव-भाईंदरमध्ये ३१ नव्या मार्गिका; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT