pandharpur sakal
महाराष्ट्र बातम्या

आषाढी वारीत हरवले १६४० वारकरी! ग्रामीण पोलिसांनी शोधून केले नातेवाईकांच्या स्वाधीन

कोरोनाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात आषाढी वारी झाल्याने मोठी गर्दी होती. वारीतील गर्दीत तब्बल ४७९ जणांचा रस्ता चुकला. त्यात ७२ बालकांचा समावेश होता. ग्रामीण पोलिसांच्या मिसिंग सेलने त्यांना शोधून पालकांच्या स्वाधीन केले. यात्रा काळात एक हजार ६४० जण हरविल्याची नोंद वारीवेळी मिसिंल सेलकडे झाली होती.

तात्या लांडगे

सोलापूर : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी विविध राज्यातून तब्बल १२ लाखांहून अधिक भाविक आले होते. कोरोनाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात वारी झाल्याने मोठी गर्दी पहायला मिळाली. या वारीतील गर्दीत तब्बल ४७९ जणांचा रस्ता चुकला. त्यात ७२ बालकांचा समावेश होता. ग्रामीण पोलिसांच्या मिसिंग सेलने त्यांना शोधून पालकांच्या स्वाधीन केले. यात्रा काळात एक हजार ६४० जण हरविल्याची नोंद वारीवेळी मिसिंल सेलकडे झाली होती.

श्री ज्ञानेश्वर माऊली व संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात दोन ते तीन लाख भाविक पायी चालत पंढरपूरला येतात. सोलापूर जिल्ह्यात नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी येथे पालख्यांचा मुक्काम असतो. पालख्यांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यात वृध्द, लहान मुले, महिला असतात. गर्दीत ते चूकतात आणि नातेवाईकांपासून दूर जातात. दरवर्षीचा हा अनुभव लक्षात घेऊन यंदा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मिसिंग सेल सुरु केला होता. त्यासाठी दोन्ही पालख्यांसोबत पोलिसांची स्वतंत्र पथके नेमली होती. ४ ते १४ जुलै या दहा दिवसांत ४७९ व्यक्ती हरविल्याची तक्रार मिसिंल सेलकडे नोंदविल्या गेल्या. त्यांच्या पालकांचा शोध घेऊन पोलिसांनी त्या चुकलेल्यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

महिला सुरक्षा कक्षाची कामगिरी

आषाढी वारीत नातेवाईकांपासून दूर गेलेल्यांच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांनी महिला सुरक्षा विशेष कक्षाची स्थापना केली होती. पोलिस उपनिरीक्षक सोनाली गोडबोले यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलिस अंमलदारांचे पथक श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत होते. त्या पथकाने वारीत हरवलेल्या सर्वाधिक व्यक्तींना विशेषत: चिमुकल्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. पोलिस अधीक्षक सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी त्या पथकाचे कौतूक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder : केतन अग्रवाल हत्याकांडाचे बीड कनेक्शन, सिया-चेतनला मदत करणारा 'तो' तरुण कोण? तपासात धक्कादायक माहिती समोर

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज भागात मुसळधार पाऊस

Unclaimed Bank Deposits : जुन्या बंद पडलेल्या बँक खात्यात पैसे विसरलात? 'या' सोप्या पद्धतीने पुन्हा मिळेल रक्कम; RBI ची नवी डिजिटल सुविधा

विकी कौशलचं कतरिनावर भारी प्रेम, पावसातला फोटो पोस्ट करत म्हणाला...'पाऊस आणि तू...'

Sankashti Chaturthi 2026: सर्वार्थ सिद्धी योगामुळे वृषभसह 'या' 4 राशींवर गणरायाची विशेष कृपा; अचानक होऊ शकतो धनलाभ!

SCROLL FOR NEXT