Flood Sakal
महाराष्ट्र बातम्या

नैसर्गिक आपत्तीमुळे वर्षभरात १७०० मृत्युमुखी

मृतांमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण सर्वाधिक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई/नवी दिल्ली - भारतात गेल्या वर्षभरात चक्रीवादळ, महापूर, दरड कोसळणे, वीज पडणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये १७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वाधिक ३५० मृत्यू महाराष्ट्रातील असून त्यापाठोपाठ ओडिशात २२३; तर मध्य प्रदेशमध्ये १९१ जणांचा मृत्यू झाला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्नमेंट’ आणि ‘डाऊन टू अर्थ’ नियतकालिकांद्वारे प्रकाशित केलेल्या ‘स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायर्नमेंट २०२२ : इन फिगर्स’ या ई-पुस्तकातून ही आकडेवारी पुढे आली आहे.

यंदाचे वर्ष हे हवामानविषयक अनेक घडामोडींच्या बाबतीत देशासाठी आव्हानात्मक राहिले. तसेच २०१२ ते २०२१ हे सर्वाधिक उष्ण दशक राहिले. गेल्या १५ वर्षांपैकी ११ वर्षांमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली. २०१६ च्या तुलनेत २०२१ मध्ये देशातील सरासरी तापमानात ०.७१ अंश सेल्सिअसची वाढ झाली. विशेष म्हणजे यंदाच्या मार्च महिन्यातील तापमानाने सर्व विक्रम मोडीत काढले. वाढत्या तापमानामुळे भारत, चीन आणि नेपाळच्या हद्दीतील जवळपास २५ हिमतलावांतील बर्फ वितळण्याचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे परिसरातील सात राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. एकंदरीत या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशात नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढल्याचे या ई-पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Darvha Crime : सात वर्षीय चिमुकलीचा खून; शेजारच्या घरात पोत्यात सापडला मृतदेह

Ashok Kharat Files: ''योनी पूजनाचे धक्कादायक व्हिडीओ...'', नेत्याचा खळबळजनक दावा, कॅप्टन खरात नेमकं करायचा तरी काय?

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

तरडे–शिंदवणे रस्त्यावर स्ट्रीट लाईटची मागणी; अपघात टाळण्यासाठी नागरिकांची पुढाकार

SCROLL FOR NEXT