School  Sakal
महाराष्ट्र बातम्या

शाळांना दिवाळीनिमित्त १८ दिवस सुट्टी! दिवाळीपूर्वी शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदली

दिवाळीची सुरवात २१ ऑक्टोबरपासून होत आहे. त्यानिमित्ताने शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांना २० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत सुटी असणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती असून त्या दिवशीही सुटी असेल.

तात्या लांडगे

सोलापूर : दिवाळीची सुरवात २१ ऑक्टोबरपासून होत आहे. त्यानिमित्ताने शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांना २० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत सुटी असणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती असून त्या दिवशीही सुटी असेल. ९ नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा पूर्ववत सुरू होतील, असे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

दरवर्षी शाळांना दिवाळीनिमित्त सुटी असते. २१ ऑक्टोबरला वसुबारस असून २१ व २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. दिवाळीच्या निमित्ताने यंदा १८ दिवस शाळा बंद राहतील. कोरोनामुळे शाळा दोन वर्षांपासून बंद राहिल्याने दिवाळी सुटीत देखील विद्यार्थ्यांवर शिक्षकांचे लक्ष असणार आहे. पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना अंकगणित, अक्षर ओळख व्हावी हा त्यामागील हेतू असणार आहे. दोन वर्षे शाळा बंद राहिल्याने असंख्य विद्यार्थी अभ्यासात अजूनही पिछाडीवर आहेत. ऑनलाइन शिक्षण घेता न आलेल्यांना विशेषत: सर्वसामान्य कुटुंबातील मुलांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जात आहे. दिवाळी सुटीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयावर निंबध लिहिणे, वाचन सराव, अंक व अक्षर ओळख याकडे लक्ष द्यायचे आहे. शिक्षकांना त्याची सक्ती नाही, पण स्वेच्छेने शिक्षकांनी ते काम करायचे आहे.

दिवाळीपूर्वी होणार वेतन

दिवाळीनिमित्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा प्रत्येकी साडेबारा ते १५ हजारांचा अग्रिम मिळेल. पण, त्यात शिक्षकांचा समावेश नसणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार लोकहिताचे निर्णय घेत असताना आता दिवाळीमुळे शिक्षकांसह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचे वेतन ऑक्टोबर अखेरीस मिळणार आहे.

दिवाळीपूर्वी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या

जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९८ शाळांमधील शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आठ-दहा दिवसांत (दिवाळी सुट्यांपूर्वी) होणार आहेत. एकाच शाळेवर पाच वर्षे सेवा बजावलेल्या शिक्षकांची दुसऱ्या शाळेत बदली होणार आहे. त्यासाठी त्यांना एकूण २० शाळांचे पर्याय द्यायचे आहेत. ऑनलाइन पद्धतीने त्यांना पर्यायातील एक शाळा मिळेल. यंदा प्रथमच ही बदली प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने वशिलेबाजी किंवा मानवी हस्तक्षेप चालणार नाही. ज्या तालुक्यात शिक्षक कमी, त्या ठिकाणीही काही शिक्षकांची बदली होऊ शकते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार तसा बदल शक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ठरलं तर मग' मधून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट? अनेक दिवसांपासून मालिकेतून आहे गायब, म्हणाली- तिथे...

Cold Storage Blas: ड्यूप्लिकेट वीरप्पनला अटक! कोल्ड स्टोरेज स्फोटात योगी सरकारची मोठी कारवाई , कोण आहे माजी आमदार अन्सार अहमद

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची SIT कडून सलग सातव्या दिवशी चौकशी

Firozabad to Kolhapur : काकणाचा चुडा, सौभाग्याचं लेणं; बांगड्यांच्या व्यापाराला कोल्हापुरात मोठी मागणी

Ayodhya: रामनवमीला रामललाचा 'सूर्याभिषेक'! दुपारी १२ वाजता सूर्यकिरणे कपाळावर चमकणार; शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अद्भूत सोहळा!

SCROLL FOR NEXT