st bus free wifi sakal
महाराष्ट्र बातम्या

ST Bus : राज्यातील १८ हजार बसेस मधील मोफत वायफाय बंद

एस. टी बसच्या प्रवासात मनोरंजन व्हावे म्हणून प्रवाशांच्या सेवेसाठी सन २०१७ मध्ये प्रत्येक बसमध्ये मोफत वायफाय देण्याची सुविधा निर्माण करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

- अमर बोरसे

शेगाव - एस. टी बसच्या प्रवासात मनोरंजन व्हावे म्हणून प्रवाशांच्या सेवेसाठी सन २०१७ मध्ये प्रत्येक बसमध्ये मोफत वायफाय देण्याची सुविधा निर्माण करण्यात आली होती. परंतू, करार संपल्याने पाच वर्षातच ही सेवा बंद पडल्याने मोफत वायफायचा गाशा गुंडाळला आहे.

राज्यातील अठरा हजार बसमध्ये मोफत वायफाय लावण्यात आले होते. यासाठी दरवर्षी अतिरिक्त एक कोटीचा भार महामंडळाने घेतला. वायफाय लावल्याने एस.टी. बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली. प्रवासामध्ये वायफाय कनेक्ट केल्यानंतर प्रवाशांचे मोफत मनोरंजन होऊ लागले. त्यामुळे एस.टी.चा प्रवास सुखद वाटू लागला होता.

परंतु सन २०१७ मध्ये एका कंपनीसोबत वायफायचा केलेला पाच वर्षांचा करार संपल्याने मोफत वायफायचा सुविधा बंद असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली वाय-फाय सेवा काही दिवसापासून बंद असल्याची तक्रार प्रवासी करीत आहेत.

एसटी प्रवाशांची संख्या वाढावी, प्रवाशांचा प्रवास रंजक व्हावा यासाठी महामंडळाने यंत्र मीडिया सोल्यूशन या खासगी कंपनीच्या माध्यमातून वाय-फाय सुविधा सुरू केली होती. त्यानंतर ‘एसटीचा प्रवास; मनोरंजन हमखास,’ अशी जहिरातबाजीही महामंडळाने केली. मात्र अनेक गाड्यांमधील वाय-फाय बंद पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

एस. टी महामंडळाच्या विविध सुविधा प्रवाशांसाठी असल्याने महामंडळ बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. परंतु बसमध्ये मनोरंजन व्हावे यासाठी लावण्यात आलेले मोफत वायफाय बंद झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण होत असून, सुविधा पुन्हा सुरू करण्यात यावी.

- विनोद टिकार, जिल्हा उपाध्यक्ष मनसे, शेगाव

महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिकांना सुविधा यासह अनेक सवलती एस.टी. महामंडळ देते परंतु प्रवासात मिळत असलेले मनोरंजन मात्र, वायफाय करार संपल्याने महामंडळ कडून हिरावले गेले आहे. त्यामुळे मोफत वायफाय सेवा उपभोगणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

- अनिल सावळे, तालुकाध्यक्ष काँग्रेस सेवादल, शेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदारासह निकटवर्तीयांवर इन्कम टॅक्सचा छापा, १० कोटींची रोकड जप्त; वऱ्हाडी बनून पोहोचले अधिकारी

ACB चा मोठा दणका! पोलिस उपनिरीक्षकासह मुख्याध्यापकाचा 'काळा' कारनामा कॅमेऱ्यात कैद; एकाने मागितले 50 तर दुसऱ्याने मगितली 25 हजारांची लाच!

Vintage Tractor Video : जुनं ते सोनं ! १०५ वर्ष भंगारात पडलेल्या ट्रॅक्टरने मालकाला बनवले कोट्यधीश; व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : हिंमत असेल तर वाळू माफिया बंद करा!" ; एकनाथ खडसेंचं सरकारला थेट चॅलेंज

Kidney Racket: किडनी तस्करी रॅकेटमधील आरोपींना ‘मकोका’ लावण्याची मागणी; आरोपींची संपत्ती गोठविणार, गृहराज्यमंत्री भोयर

SCROLL FOR NEXT