Devendra Fadnavis vs Sharad Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

सेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही खिंडार? दोन आमदार फडणवीसांच्या भेटीला

फडणवीसांच्या भेटीला गेलेल्या एका आमदाराला काही दिवसांपूर्वी ईडीची नोटीस आली होता.

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेनेतील बंडाळीनंतर आता राष्ट्रवादीलाही खिंडार पडण्याचं चित्रं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीचे सोलापूरातील माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे आमदार राजन पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या होत आहे. दरम्यान बबन शिंदे यांनाही काही दिवसांपूर्वी ईडीची नोटीस आली होती.

(2 NCP MLA Meets To Devendra Fadnavis)

दरम्यान, भाजपने राज्यात आता ऑपरेशन लोटस राबवलं आहे. भाजपने दोन दिवसांपूर्वी पनवेल येथे प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेत सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी येणाऱ्या निवडणुकांच्या तयारीला लागा अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे हे दोन आमदार फडणवीसांच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान बबन शिंदे यांना ईडीची नोटीस आली होती त्यामुळे त्यांनी भाजपचा रस्ता धरला असा आरोप काही जणांकडून करण्यात आला आहे.

भाजपकडून सध्या दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असून दुसऱ्या पक्षातील लोकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होत आहे. बबन शिंदे यांना ईडीची नोटीस आली होती, याच दबावाचा वापर करत शिंदे यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT