महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: केंद्राकडे थकलेले जीएसटीचे २ हजार कोटी आले; आणखी १२ हजार कोटी येणार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये आहेत. दिल्लीत त्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने राज्य सरकारचे जीएसटीचे २ हजार कोटी रिलिज केले आहेत. ही महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बाब असून सीएजीने ऑडिट केल्यानंतर तेही १२ ते १३ हजार कोटी रुपये येतील, असं फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

यासोबतच एनडीआरएफचे निकष बदलणं गरजेचं असून 'सततचा पाऊस' असा बदल त्यामध्ये करण्याची गरज असल्याचं बैठकीत सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यासह मोठे प्रोजेक्ट उभा करण्यासाठी बँक लोण देत नाही. त्यामुळे धोरणात बदल करण्याचा मुद्दाही त्यांनी बैठकीत मांडल्याचं सांगितलं.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने हे जीएसटीचे पैसे मिळावेत, यासाठी वारंवार प्रयत्न केले. परंतु ते मिळत नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत जाहीरपणे आक्षेप घेतले होते. मात्र आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच हे पैसे मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SP Action Against Police Officer : तक्रार दाखल करण्याची भिती घालून पैसे मागणाऱ्या पोलिसावर एसपींची थेट कारवाई, कोल्हापुरातील घटना

Pregnant Woman: महामार्गावरील कोंडीत मातीच्या ढिगाऱ्यावरच प्रसूती; येवल्यातील सावरगावजवळील घटना; वेदनेचा डोंगर अन् मदतीचा हात!

IND vs PAK: आज एक नाही, तर भारत-पाकिस्तानचे दोन T20 सामने; कधी आणि कुठे पाहाणार? जाणून घ्या

Bengaluru Car Accident : बंगळुरुत आणखी एक भीषण अपघात ! भरधाव कार दुभाजक ओलांडून बसला धडकली, पाच जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी; ४९० तक्रारदारांना २ कोटी ९० लाखांहून अधिकचा जप्त मुद्देमाल परत

SCROLL FOR NEXT