महाराष्ट्र बातम्या

Accidet News: खड्ड्याने घेतला आणखी एक बळी; दोन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

Accidet News: गाडी चालवतांना अचानक खड्डा आला. यावेळी ब्रेक मारला मात्र मागून आलेली दुचाकी आयशरला धडकली आणि दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशी संतापजनक घटना समोर आली आहे. जिहान सलमान शाह असे त्या २ वर्षीय मुलाचे नाव आहे.

मालेगावचे रहिवाशी असलेले सलमान शाह हे आपल्या पत्नी सना सलमान शाह आणि मुलगा जिहान यांच्या सोबत खुलताबाद येथे उरूससाठी चालले होते. त्यांचा शिऊर बंगला- नांदगाव मार्गावरील शिंदीनाला फाट्यावर अपघात झाला. यावेळी त्यांच्या मुलगा जिहान सलमान शाह याचा जागीच मृत्यू झाला. तर ते आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली.

साडेचार वाजण्याच्या सुमारास ते शिंदीनाला फाटा येथील धनेश्वर वस्तीजवळ आले. याचवेळी पुढे धावत असलेल्या आयशर ट्रकने खड्ड्यामुळे अचानक ब्रेक मारला. यावेळी दुचाकी आयशरला धडकली.

पुढे बसलेल्या दोन वर्षीय जिहान सलमान शाहच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पती पत्नी गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर आयशर चालक ट्रकसह फरार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT