Measles disease sakal
महाराष्ट्र बातम्या

Measles Disease : राज्यात गोवरचे २० मृत्यू

मुंबईसह राज्यात गोवरचे रुग्ण वाढले आहेत. राज्यात २०२२ मध्ये आतापर्यंत १४२ उद्रेक झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईसह राज्यात गोवरचे रुग्ण वाढले आहेत. राज्यात २०२२ मध्ये आतापर्यंत १४२ उद्रेक झाले आहेत.

मुंबई - मुंबईसह राज्यात गोवरचे रुग्ण वाढले आहेत. राज्यात २०२२ मध्ये आतापर्यंत १४२ उद्रेक झाले आहेत. या आधी २०२१ मध्ये फक्त एक, २०२० मध्ये दोन, २०१९ मध्ये तीन गोवर उद्रेक नोंदवण्यात आले होते. राज्यात यंदा एकूण १,१०४ गोवरच्या निश्चित रुग्णांची नोंद झाली; तर एकूण २० गोवरच्या मृत्यूंची नोंद झाली. २०२२ या वर्षात सर्वाधिक गोवर रुग्ण आणि मृत्यू झाले आहेत.

मुंबईत सर्वाधिक रुग्णसंख्या

राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये व पालिका क्षेत्रात गोवरचा उद्रेक असून मुंबईत सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो.

गोवर उद्रेक म्हणजे काय?

एका विशिष्ट भागात चार आठवड्यांच्या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक गोवर संशयित रुग्ण आढळल्यास आणि त्यापैकी किमान दोन रुग्ण प्रयोगशाळा तपासणीत गोवरबाधित रुग्ण आढळल्यास त्याला गोवर उद्रेक झाला, असे म्हणतात.

गोवरची लक्षणे

ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरीरावर लाल सपाट पुरळ ही आजाराची लक्षणे आहेत. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्यकर्ण संसर्ग व न्यूमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व, मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'यार हे कोणाला बाहेर ठेवणार?', भारताचा संघ पाहून शोएब अख्तर चक्रावला; पाहा काय म्हणाला

Banjara community Reservation : बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटियरनुसार आरक्षण द्या; आ. संजना जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Maharashtra Rain Update: मुंबई पुणेकरांनो सावधान! हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

Pune Police : घराचा धागा पुन्हा जुळला; पोलिसांनी तरुणीला दिला मायेचा आधार

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

SCROLL FOR NEXT