State Election Commission
State Election Commission esakal
महाराष्ट्र

राज्यात २० लाख दुबार मतदार; आधारशी संलग्न करण्याची मोहीम एक ऑगस्टपासून

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

राज्यात ज्यांची नावे एकापेक्षा अनेक मतदार यादीत आहेत त्यांचा शोध घेण्याचे काम निवडणूक आयोगाकडून सुरू आहे.

मुंबई - राज्यात ज्यांची नावे एकापेक्षा अनेक मतदार यादीत आहेत त्यांचा शोध घेण्याचे काम निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. अशा मतदारांचा फोटोंच्या माध्यमातून शोध घेतला जात असून निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमध्ये असे चेहरेपट्टी जुळणारे सुमारे ४० लाख मतदार आढळले असून त्यापैकी २० लाख मतदार हे दुबार मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे यादीतून वगळण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी संलग्न करण्याच्या मोहिमेसंदर्भात माहिती देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले, राज्यातील मतदान याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्ती केली जात आहे. त्यानुसार ‘पीएसई’ हे सॉफ्टवेअर वापरून छायाचित्रांनुसार छाननी केली जात असून समसमान असलेली छायाचित्रे असलेली मतदारांची यादी तपासली जात आहे. यात एका फोटोवर अगदी कुटुंबातील पाच ते सहा जणांनी नोंदणी केल्याचे दिसून आले आहे. असे सुमारे २० लाख मतदार आढळले असून त्यांच्याकडून सात नंबरचा फॉर्म भरून घेतला जाणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत सर्व मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती केली जाईल व ही नावे वगळली जातील, अशी माहिती श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

आधारशी संलग्न करण्याची मोहीम

मतदार ओळख पत्र हे आधार कार्डशी संलग्न करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात मतदार कार्ड आधारशी संलग्न करण्याची मोहीम येत्या एक ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. आधारशी मतदारकार्ड संलग्न करण्याची सक्ती नसली तरी, इतर पासपोर्ट आदी ११ पर्यायी कागदपत्रे द्यावीच लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ऑगस्ट २०२२ ते एप्रिल २०२३ पर्यंत ही मोहीम चालणार आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी देखील याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.

आधारशी संलग्न करणे ऐच्छिक

मतदारकार्ड आधारशी संलग्न केल्यामुळे मतदाराच्या ओळखीचे प्रमाणीकरण, एकापेक्षा अधिक नोंद वगळणे तर शक्य होणार आहेच. पण निवडणूक तसेच मतदानासंबंधी माहिती व आयोगाकडून प्रसारित होणाऱ्या सूचना मतदाराला त्याच्या फोनपर्यंत थेट पाठविता येणार आहेत. मात्र, आधार संलग्न करणे हे बंधनकारक नसून ऐच्छिक आहे. आधारशी संलग्न केले नाही म्हणून कोणत्याही मतदाराचे नाव वगळण्यात येणार नाही. तसेच आधारक्रमांकाची गोपनीयता अबाधित ठेवण्यात येईल. आयोगातील कोणत्याही कर्मचाऱ्याने जर ती भंग केली तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. ‘आधार’ द्यायचे नसेल तर अन्य कोणत्याही कागदोपत्री पुराव्याशी मतदारकार्ड संलग्न करावे लागणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

‘आधार’ नसल्यास ही कागदपत्रे

मतदाराकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना ६ ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना मनरेगा जॉब कार्ड, फोटोसहित किसान पासबुक, आरोग्य स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआय द्वारा दिले गेलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, फोटोसहित पेन्शन कागदपत्रे, केंद्र / राज्य शासन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, आमदार / खासदार यांना दिलेले ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र या ११ पर्यायापैंकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT