20-minute journey PM Narendra Modi and CM Eknath Shinde Travel by plane advice gave about Maharashtra
20-minute journey PM Narendra Modi and CM Eknath Shinde Travel by plane advice gave about Maharashtra  sakal
महाराष्ट्र

PM Narendra Modi : पीएम सीएमचा एका विमानाने प्रवास

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाजपचे नेते सातत्याने कौतुक करतात ,त्यांचे तोंड भरून कौतुक करण्यात कोणतीही कसर सोडली जात नाहीच .आज तर छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील कार्यक्रम आटोपून आयएनएस शिकारा मार्गे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर गेले तेंव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी समवेत घेतले.

जवळ बसवून घेत या सुमारे २० मिनिटांच्या प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राबद्दल कोणते सल्ले दिले ,काय चर्चा केली याबद्दल कमालीची उत्सुकता व्यक्त केली जाते आहे.डबल इंजिनचे सरकार असले की विकासाला गती येते हा सध्याचा परावलीचा शब्द .

मुंबईसाठी नव्या कोणत्या अभिनव योजना सुरु होवू शकतात ,राजकारणाचे नवे आराखडे काय असू शकतात यावर चर्चा झाली काय याबद्दल उत्सुकता आहे.निवडणूक आयोगाकडे सुरु असलेली चिन्हाबाबतची सुनावणी ,सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारी रोजी होणारी आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी ,

ओबीसी आरक्षणाबाबत निकाल अद्याप प्रलंबित असल्याने रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राजकीय विषयांवर काही बातचीत झाली की जी २० चे आयोजन ,अमृयकालातला अर्थसंकल्प अशा भारताला महासत्ता करणार्या विषयांबाबत पंतप्रधानांनी त्यांचे विचार ऐकवले ते समजू शकले नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीव आहे.२२ दिवसांपूर्वीच्या मुंबई दौर्यादरम्यान मेट्रोत डाव्या उजव्या बाजुला बसवून पंतप्रधानांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी केलेला असाच संवाद गाजला होता.आज दोघे एकाच विमानात होते.याच विमानातून मुंबईची पंतप्रधानांनी व्हिडीओग्राफी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दोघांच्या विमानात नव्हते.ते या ताफ्यात असलेल्या दुसर्या विमानातून प्रवास करत होते.आज छत्रपती शिवाजी टर्मिनसवर वंदे भारतच्या दोन गाडयांना झालेल्या हिरवी झेंडी दाखवण्याच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारची जागा देण्यात आली होती.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागतपर भाषण झाले.जगन्नाथ शंकरशेठ हे आधुनिक मुंबईचे निर्माते तर रेल्वेच्या आधुनिकीकरणाचे निर्माते नरेंद्र मोदी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे ,खासदार राहुल शेवाळे ,माजी राज्यमंत्री आमदार योगेश सागर या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसले होते. राज्यपालांना थकवा ,प्रकृती नरम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागच्या दौर्यानंतर लगेचच मला पदमुक्त करा असे पत्र पाठवणार्या राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना आज थकवा जाणवत होता.ते मुंबई विमानतळावर स्वागताला हजर झाले पण दिवसभराच्या दौर्यात सहभागी होवू शकत नसल्याचा सांगावा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT