Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

'ठाकरेंच्या फार्म हाऊसवर पैशाची झाडे' दोन हजारांच्या नोटा लपवल्या; भाजप नेत्याचा गंभीर आरोप Uddhav Thackeray

रुपेश नामदास

भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना (ठाकरे गटाचे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेवून उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे की, "ठाकरे यांच्या कर्जत येथील फार्म हाऊसमध्ये किती दोन हजार रूपयांच्या नोटांची झाडे लावली आहेत ती झाडं मोज मग आमच्यावर टीका करा" असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप केले आहेत. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या युवा सेनेच्या माध्यमातून बीएमसी निवडणुकीतील उमेदवारांना तिकीट देण्यासाठी दोन कोटींची मागणी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंनी आज पर्यंत पैसे घेतल्याशिवाय कोणाला काहीही दिलं नाही. आता त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेही देखील तेच काम करतो. असा आरोप राणे यांनी केला आहे.

दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला. देशाची व्यवस्था सरकारच्या गुलामाप्रमाणे काम करत असल्याचे ते म्हणाले होते.

संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत नितेश राणे म्हणाले, भ्रष्टाचाराच्या पैशातून कमावलेल्या 2000 च्या नोटांचे बंडल कर्जत फार्म हाऊसमध्येच ठेवले आहेत. त्यामुळेच संजय राऊत अशी टिप्पणी करत आहेत. त्यामुळे फार्म हाऊसची चौकशी झाली पाहिजे, तेथे किती पैसे ठेवले आहेत, याचा शोध घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samanvay Cafe: आरोग्यदायी डाएट अन् बनारसी कचोरी-जलेबीचा आस्वाद; चहाच्या घोटासोबत सुधारणार पोलीस-जनता 'संबंध'

Success Story: वयाच्या १७ व्या वर्षी उंचावली देशाची मान ! खेडेगावातील प्रणवला मिळाली ३.५५ कोटींची स्कॉलरशिप; गणितात ठरलाय 'वर्ल्ड टॉपर'

BADMINTON: ठाण्याच्या या बॅडमिंटन अकादमीची चर्चा थेट परदेशात! मालदीव, आयर्लंड, स्पेन अन् अमेरिकेतील खेळाडू प्रशिक्षणासाठी इथेच का येतात?

Marathi News Live Updates : सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ खासदार आज पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Chhatrapati Sambhajinagar Airport Recruitment: विमानतळ भरतीच्या नावाखाली संभाजीनगरमध्ये विद्यार्थी वेठीस; परीक्षा घेणारेच गायब; केंद्रावर सोयी-सुविधांचाही अभाव

SCROLL FOR NEXT