ST Employees not paid Salary during strike period sakal
महाराष्ट्र बातम्या

St Employee : 2018 च्या संपातील दोषी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात

जुन 2018 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबीत मागण्यासाठी दोन दिवसांचा बेकायदा संप पुकारला होता.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - जुन 2018 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबीत मागण्यासाठी दोन दिवसांचा बेकायदा संप पुकारला होता. त्यामध्ये दोषी एसटी कर्मचाऱ्यांवर महामंडळाच्या नियमांनुसार कारवाई करत एका दिवसाला आठ दिवसांच्या वेतनाची कपात करण्यात आली होती. या कपातीला एसटीच्या मान्यता प्राप्त संघंटनेने विरोध केला होता. तर प्रकरण औद्योगीक न्यायालयात होते. दरम्यान न्यायालयाने आठ ऐवजी एका दिवसाला दोन दिवसांच्या वेतन कपातीचा निर्णय घेतल्याने त्याच्या अंमलबजावणीच्या सुचना एसटी महामंडळाने विभाग नियंत्रकांना दिल्या आहे.

डिसेंबर महिन्याचे वेतन 7 जानेवारीला देतांना एका दिवसाला दोन दिवसांचे वेतन कपात करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऐन दसरा व दिवाळीच्या दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ही कपात होणार होती. मात्र, कपातीमूळे सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचण होऊ नये यासाठी कपात तात्पुरती स्थगीत करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता.

मात्र त्यानंतर आता एसटी महामंडळाचे कर्मचारी वर्ग व औद्योगीक संबंध विभागाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड यांनी प्रत्येक महिन्याला एक दिवसाप्रमाणे कपात करण्याचे आदेश दिले आहे.

परिणामी 7 जानेवारी रोजी झालेल्या वेतनातून एका दिवसाला दोन दिवसांच्या वेतनाची कपात केली असून, दुसऱ्या दिवसाची कपात फेब्रुवारीच्या महिन्यात केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर महामंडळाने औद्योगीक न्यायालयाच्या निर्णयापुर्वी एक दिवसाला आठ दिवसांची केलेल्या कपातीचे पैसे एसटी कर्मचाऱ्यांना परत मिळणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले आहे.

एसटी महामंडळाच्या नियमानुसार बेकायदा संप पुकारल्यास एका दिवसाला आठ दिवसांच्या वेतनाच्या कपातीचा नियम आहे. त्यानुसार त्यावेळी दोन दिवसांच्या संपासाठी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या 16 दिवसांची कपात केली आहे. मात्र आता औद्योगीक न्यायालयाने एक दिवसाला दोन दिवसांची कपात करण्याच्या सुचना असल्याने कपात झालेल्या इतर दिवसांचे पैसे कर्मचाऱ्यांना परत मिळणार आहे.

- अजीत गायकवाड, महाव्यवस्थापक, कर्मचारी वर्ग व औद्योगीक संबंध

ना काम ना दाम या तत्वाच्या वेतन कपातीविरूद्ध औद्योगीक न्यायालयात दाद मागण्यात आली होती.त्यानुसार कपातीचे दिवस कमी करण्यात आले. याला तिन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. त्यानंतर आता ऐन नविनवर्षांच्या सुरूवातीलाच वेतनातून कपातीच्या अंमलबजावणीचा निर्णय घेणे चुकीचे आहे.

- संदिप शिंदे, अध्यक्ष, राज्य एसटी कामगार संघंटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT