Rahul Gandhi esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Gandhi: भारतात 22 लोकांकडे देशातील 50 टक्के संपत्ती ; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल!

Rahul Gandhi: आज, शनिवारी सेंदूरवाफा येथील संत गजानन महाराज मंदिराच्या पटांगणात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

साकोली (जि. भंडारा), ता. १३ : महिला घर चालवून दोन पैसे मिळवण्याकरिता नोकरी, व्यवसायसुद्धा करतात. मात्र, त्यासाठी त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. देशाच्या भवितव्याचे संगोपन करण्यात महिलांचे योगदान लक्षात घेऊन आम्ही सत्तेत आल्याबरोबर महत्त्वाचा निर्णय घेणार आहोत. भारतातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील एका महिलेच्या बँक अकाउंटमध्ये वर्षाला एक लाख रुपये जमा करणार येतील. दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात साडेआठ हजार रुपये जमा होतील, असे आश्‍वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिले.

आज, शनिवारी सेंदूरवाफा येथील संत गजानन महाराज मंदिराच्या पटांगणात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये त्यांनी ही घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, डॉ. प्रशांत पडोळे, जयंत पाटील, माणिक ठाकरे, नामदेव किरसान व प्रतिभा धानोरकर असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

यावेळी काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी यांनी सांगितले की, देशात सर्वात मोठा मुद्दा बेरोजगारीचा आहे. आमचे सरकार येताच अग्निवीर योजना बंद करू. ही अग्निवीर योजना सैन्य दलाची नसून ती पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयात तयार करून लागू केली आहे. सत्तेत येतात अग्निवीर योजना बंद करू, अशी घोषणाही राहुल गांधी यांनी केली.

त्यांनी सांगितले की, आपल्या भारतात २२ असे लोक आहेत की, ज्यांच्याकडे या देशातील ५० टक्के संपत्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी धर्मावर बोलतात, कधी गरीबांवर बोलतात, कधी हिंदू-मुस्लिम यांबाबत बोलतात. परंतु, त्यांचे पूर्ण लक्ष आपल्या भांडवलदार मित्रांना फायदा व्हावा याकडेच असते.  

तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करता. तेव्हा त्यावर तुम्हाला १८ टक्के कर लागतो. मात्र, देशातील सर्वाधिक श्रीमंत असलेले अदानी यांनासुद्धा तितकाच कर द्यावा लागतो. त्यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदींनी निवडक उद्योगपती श्रीमंतांसाठी सरकार चालवले आहे. त्यामध्ये सर्वात मोठे नाव अदानींचे आहे. ज्या दिवशी मोदींचे सरकार आले. तेव्हापासून अदानींच्या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत वाढ झाली आहे. हे सरकार अदानींचेच आहे. सर्व काही अदानीसाठी केले जात आहे. मुंबईतील एअरपोर्टसुद्धा अदानीला दिले गेले आहे. भारतातील सर्व एअरपोर्ट अदानींच्या मालकीचे आहेत, असा जोरदार हल्लाबोल राहुल गांधी यांनी महाविकास आघाडी व काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचार सभेत केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT