Omicron Virus esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्याच्या चिंतेत भर; दिवसभरात ओमिक्रॉनचे २३ नवे रुग्ण!

कोरोनाची नवी रुग्णवाढ हजाराच्यावर

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरुच असताना ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron variant) आज २३ रुग्ण आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे. तसेच कोरोनाच्या नवे १,१७९ रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्यविभागानं ही माहिती दिली. (23 more patients have been found to be infected by Omicron in Maharashtra)

राज्यात दिवसभरात १,१७९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच ६१५ रुग्ण बरे झाले आहेत, तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यात २३ नवे ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळं या रुग्णबाधितांची संख्या ८८ वर पोहोचली आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट ९७.७ टक्क्यांवर पोहोचला असून मृत्यूचं प्रमाण २.१२ टक्के इतक आहे. आजवर ६,८१,१७,३१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,५३,३४५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, म्हणजेच हे प्रमाण ९.७७ टक्के आहे. दरम्यान, सध्या ७६,३७३ रुग्ण होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ८९९ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

ओमिक्रॉनबाधित रुग्णांची सविस्तर माहिती

राज्यात आज आढळलेल्या २३ ओमिक्रॉनबाधितांपैकी २२ नमुने एनआयव्हीत तर १ नमुना एनसीएलमधील तपासणीत आढळून आला आहे. या २३ पैकी १३ रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत. यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात ३ तर ग्रामीण भागात ३ रुग्ण आढळून आले आहेत. तर पिंपरी-चिंचवडमध्ये ७ रुग्ण आढळून आले. तसेच मुंबईत ५, उस्मानाबादेत २, ठाणे-नागपूर-मीरा भाईंदर येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण ८८ ओमिक्रॉनचे रुग्ण झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT