Swine Flu In Maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

कोरोनानंतर महाराष्ट्रावर आता 'स्वाइन फ्लू'चं संकट; राज्यात 2,337 रुग्ण तर 98 जणांचा मृत्यू

गणेशोत्सवाला सुरुवात होत असतानाच स्वाइन फ्लूनं राज्याच्या चिंतेत भर पाडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

गणेशोत्सवाला सुरुवात होत असतानाच स्वाइन फ्लूनं राज्याच्या चिंतेत भर पाडली आहे.

Swine Flu In Maharashtra : गणेशोत्सवाला (Ganeshotsav) सुरुवात होत असतानाच स्वाइन फ्लूनं (Swine Flu) राज्याच्या चिंतेत भर पाडली आहे. यावर्षी 1 जानेवारी ते 28 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचे 2,337 रुग्ण आढळले असून 98 जणांचा मृत्यू झालाय. यानंतर राज्याच्या आरोग्य विभागानं (Health Department) गणेशोत्सवात सहभागी होताना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.

आरोग्य विभागानं सांगितलं की, ही प्रकरणं 19 जिल्ह्यांमध्ये नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 770 प्रकरणं आणि 33 मृत्यू पुण्यात झाले आहेत. विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत 348 रुग्ण आढळून आले असून तीन मृत्यू झाले आहेत, तर शेजारच्या ठाण्यात 474 रुग्ण आणि 14 मृत्यू झाले आहेत. या कालावधीत कोल्हापुरात 159 प्रकरणं आणि 13 मृत्यूची नोंद झालीय.

राज्यात 98 जणांचा मृत्यू

आकडेवारीनुसार, यावर्षी 1 जानेवारी ते 28 ऑगस्ट या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूचे 2 हजार 337 रुग्ण आढळून आले असून 98 जणांचा मृत्यू झालाय. स्वाइन फ्लूचे वाढते रुग्ण पाहता नागरिकांनी आगामी सण सावधगिरीने साजरे करावेत, असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. इन्फ्लूएंझा सारख्या आजारानं ग्रस्त असलेल्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं आणि लोकांनी सार्वजनिक मेळाव्यात कोविड-19 नियमांचं पालन करावं, असं आवाहनही करण्यात आलंय.

पुण्यात सर्वाधिक 770 रुग्ण

1 जानेवारी ते 28 ऑगस्ट दरम्यान पुण्यात सर्वाधिक 770 रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल ठाणे (474), मुंबई (348), नाशिक (195) आणि कोल्हापूर (159) आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 33 मृत्यूंसह पुण्याचा क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ ठाणे (14), कोल्हापूर (13), नाशिक (12), सातारा (5), अहमदनगर (5) आणि मुंबई (3) यांचा क्रमांक लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election News: महानगरपालिका निवडणुकीआधी मतदान केंद्रांत बदल; केंद्रे स्थलांतरित, कुठे आणि का? जाणून घ्या...

Jagdeep Dhankhar Health Update: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड रूग्णालयात दाखल!, ‘वॉशरूम’मध्ये पडले होते दोनदा बेशुद्ध

AMIM-BJP Alliance : अकोटमध्ये 'एमआयएम-भाजप भाऊ-भाऊ'; आमदार साजिद खान पठाण यांनी पुराव्यासह केला पर्दाफाश!

Mangalwedha ST Depot : मंगळवेढा एसटी आगाराची जिल्ह्यात 'पहिली' झेप; १० लाखांच्या उत्पन्नासह सोलापूर जिल्ह्यात अव्वल!

Latest Marathi News Live Update : सटाण्यात अनैतिक मानवी व्यापाराचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT