ST journey Sakal
महाराष्ट्र बातम्या

ST Passengers : २५ लाख प्रवाशांची ‘एसटी’कडे पाठ

राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपानंतर एसटीची वाहतूक पूर्वपदावर आली. मात्र एसटीची रोजची प्रवासी संख्या लक्षात घेता यात सुमारे २५ लाख प्रवाशांची घट झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपानंतर एसटीची वाहतूक पूर्वपदावर आली. मात्र एसटीची रोजची प्रवासी संख्या लक्षात घेता यात सुमारे २५ लाख प्रवाशांची घट झाली आहे. संप मिटून बरेच दिवस झाले असले, तरीही प्रवासी मात्र मोठ्या संख्येने एसटीकडे वळाले नाही. संपाच्या काळात प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार मिळाला. त्यामुळे सुमारे २५ लाख प्रवाशांनी आता एसटीला राम राम ठोकला आहे. एसटी प्रशासनाने उत्पन्न वाढविण्यासाठी व खर्च बचतीसाठी विविध उपाय योजले. मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. उलट प्रवासी संख्येत घटच झाली. परिणामी उत्पन्नही घटत गेले. दैनंदिन खर्चाचा विचार केला तर एसटी चालविण्यासाठी रोजचा खर्च हा २६ कोटी रुपयांचा आहे. परंतु, उत्पन्न १६ कोटी रुपये इतके आहे.

पुणे विभागाची स्थिती

  • सुमारे १ लाख प्रवासी संख्या

  • सुमारे ८५ लाख प्रवासी उत्पन्न

  • ८४९ एसटी बसची संख्या

  • २,५०,००० किमी रोजची वाहतूक

का दुरावले प्रवासी?

  • संपाच्या काळात सेवा बंद.

  • दरम्यान प्रवाशांना खासगी वाहनांने प्रवासाची सवय

  • एसटी बसचा दर्जा अत्यंत खालावला

  • खराब गाड्यातून प्रवास त्रासदायक

  • तिकीट दरात १८ टक्के वाढ

  • खासगी वाहतुकीचे दर एसटीच्या तुलनेत स्वस्त

राज्यातील स्थिती

  • दैनंदिन प्रवासी संख्या - ३३ लाख (५८ लाख)

  • प्रवासी उत्पन्न - सुमारे १६ कोटी (२२ कोटी)

  • दैनंदिन खर्च - २६ कोटी (२५ कोटी)

  • एसटी बसची संख्या - १३ हजार (१३ हजार)

(कंसात संपापूर्वीची संख्या)

प्रवासी संख्या कमी झाली हे खरे आहे. मात्र, ती वाढविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. चांगल्या प्रवासासाठी नवीन बस घेतल्या जात आहे.

- शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

प्रवासी एसटीपासून दूर जाणे ही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. संपानंतर एसटीच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाले आहेत. एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अन्य पर्यायांवरदेखील काम केले पाहिजे.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी कर्मचारी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT