विमान सोलापूर  sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर विमानतळावर बांधली २५००० लिटरची इंधन टाकी! विमानसेवा सुरळीत, पण मोकाट कुत्र्यांमुळे अनेकदा विमानाला घ्याव्या लागतात हवेत घिरट्या अन्‌...

सोलापूर विमानतळावरुन आता सोलापूर-गोवा, सोलापूर-मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरु झाली आहे. आगामी काळात सोलापूर-तिरुपती सेवा सुरु होईल, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे. सोलापूर विमानतळावर नाइट लॅण्डिंगची सोय करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळावर 25000 लिटर क्षमतेची इंधन टाकी बांधण्यात आली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर विमानतळावरुन आता सोलापूर-गोवा, सोलापूर-मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरु झाली आहे. आगामी काळात सोलापूर-तिरुपती अशीही सेवा सुरु होईल, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे. तसेच सोलापूर विमानतळावर नाइट लॅण्डिंगची सोय करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळावर २५ हजार लिटर क्षमतेची इंधन टाकी बांधण्यात आली आहे.

सोलापूर-मुंबई या मार्गावर ‘स्टार एअर’ची विमानसेवा सुरु आहे. मुंबईत विमानांची गर्दी असते तेव्हा सोलापूरला येणारे विमान मुंबईला परत जाताना सोलापुरातच इंधन भरले जाते. प्रत्येक खेपेला ‘स्टार एअर’चे विमान सोलापुरातच तीन हजार लिटर इंधन भरते. विमानतळ सुरु झाल्याने मंत्र्यांची विमाने, हेलिकॉप्टर सोलापुरात उतरतात. तेही इंधन भरतात. कायमची इंधन टाकी उभारल्याने त्यांचीही सोय झाली आहे.

गोवा-सोलापूर ही विमानसेवा ‘फ्लाय ९१’कडून दिली जात आहे. ही विमाने मात्र गोव्यातूनच इंधन भरून येतात, असेही विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्येक खेपेला मुंबईला जाणाऱ्या विमानाला अंदाजे तीन हजार लिटर आणि हेलिकॉप्टरला दीड हजार लिटर इंधन लागते. इंधनाची सोय झाली, पण भटकी कुत्री, परिसरातील चिकन, मटण दुकानांमुळे हवेत घिरट्या घेणाऱ्या पक्षांचा प्रश्न अजूनही ‘जैसे थे’ असल्याची खंत विमानतळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली आहे.

मोकाट कुत्र्यांमुळे विमानाच्या हवेतच घिरट्या

महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विमानतळावर नाईट लॅण्डिंग सुरु करण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे सोलापुरात उद्योगवाढ होईल. मात्र, विमानतळावरील मोकाट कुत्र्याचा प्रश्न अजूनही पूर्णतः: सुटलेला नाही. अनेकदा विमानतळ परिसरातील मोकाट कुत्र्यांमुळे विमानाला हवेत घिरट्या घ्याव्या लागतात, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. परिसरातील चिकन, मटनविक्री दुकानांमुळे मोकाट कुत्री व पक्षांच्या वावर देखील अद्याप ‘जैसे थे’ आहे. विमान उतरण्यापूर्वी व उड्डाण घेण्यापूर्वी फटाक्यांचा आवाज केला जातो, जेणेकरुन पक्षी दूर जातील. पण, महापालिकेला ही बाब गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. विमानसेवा सुरळीत राहण्यासाठी महापालिकेने विमानतळ परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी सोलापूरकरांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT