admission esakal
महाराष्ट्र बातम्या

विज्ञान शाखेतून २५,००० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश! २५ मेपूर्वी जाहीर होईल दहावीचा निकाल; अकरावीची प्रवेश प्रक्रिया मेअखेर

सोलापूर जिल्ह्यातील २१५ वाणिज्य महाविद्यालयांमध्ये १२ हजार ३८१ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून कला शाखेची प्रवेश क्षमता २३ हजारांपर्यंत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सुरवातीला गुणपत्रिका, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखल्याची छायांकित प्रत जोडून अर्ज करावा लागतो. संबंधित महाविद्यालयांकडून एकूण तीन गुणवत्ता याद्या प्रसिद्ध केल्या जातात.

तात्या लांडगे

सोलापूर : दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल २५ मेपूर्वी जाहीर होणार असून विद्यार्थी आता पुढील प्रवेशाच्या तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील १९८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेतून २५ हजार २३७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी किमान ८५ टक्के गुण आवश्यक असतात, नाहीतर व्यवस्थापन कोट्यातून त्यांना शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागतो.

सोलापूर जिल्ह्यातील २१५ वाणिज्य महाविद्यालयांमध्ये १२ हजार ३८१ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून कला शाखेची प्रवेश क्षमता २३ हजारांपर्यंत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सुरवातीला गुणपत्रिका, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखल्याची छायांकित प्रत जोडून अर्ज करावा लागतो. संबंधित महाविद्यालयांकडून एकूण तीन गुणवत्ता याद्या प्रसिद्ध केल्या जातात. तरीदेखील प्रवेश शिल्लक राहिल्यास चौथी गुणवत्ता यादी देखील लावली जाते. पण, विज्ञान शाखेसाठीच गुणवत्ता याद्या लावाव्या लागतात.

वाणिज्य आणि कला शाखेसाठी प्रवेश कमीच होऊ लागले असून पटसंख्येअभावी कला शाखेच्या अनेक तुकड्या मागील काही वर्षांत बंद कराव्या लागल्या आहेत. प्रवेशापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये विशेष मोहीम राबवून विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे देखील त्याठिकाणी काढून दिली जातात. दुसरीकडे गावागावात असलेल्या ई-महासेवा केंद्रातूनही ती सोय करून देण्यात आली आहे.

इयत्ता अकरावीसाठी प्रवेश क्षमता

  • शाखा प्रवेश क्षमता महाविद्यालये

  • विज्ञान २५,२३७ १९८

  • वाणिज्य १२,३८१ २१५

  • कला २२,९२४ ११२

कला शाखेचे शेकडो शिक्षक अतिरिक्त

माध्यमिक शाळेशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांना ८० विद्यार्थ्यांसाठी एक तुकडी मंजूर असते. पण, पटसंख्या कमी होऊन एकूण तुकड्यांमधील शेवटच्या तुकडीत ३० जरी विद्यार्थी राहिले तरी तुकडी सुरूच राहते. दुसरीकडे उच्च महाविद्यालयाशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांना १२० पटाच्या तुकडीस मान्यता दिली जाते. त्या महाविद्यालयातील एकूण तुकड्यांमधील शेवटच्या तुकडीत ५० विद्यार्थी असतील तरी चालते. पण, पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होतात. काही वर्षांत कला शाखेचे प्रवेश घटल्याने शेकडो शिक्षक अतिरिक्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: गोपीनाथ मुंडेंची तिसरी लेक राजकारणात; यशश्री मुंडेंचा उमेदवारी अर्ज, प्रितम मुंडे बिनविरोध?

UGC NET Result: UGC NET निकाल कधी लागणार, जाणून घ्या मागील वर्षांचा ट्रेंड काय सांगतो?

Pune News : आयटी पार्कसह उद्योगांच्या समस्या सोडवा; विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची सूचना

Neeraj Chopra: ऑलिंपिक रौप्य विजेत्या नीरज चोप्राला आता सुवर्णपदकाचा ध्यास; तांत्रिक बाबींमध्ये सुधारणेचा प्रयत्न

Shirur Accident : शिरूरमध्ये दुर्दैवी अपघात; पिकअप टेम्पोची धडक, दुचाकीवरील दोन तरुण ठार

SCROLL FOR NEXT