Rail  sakal
महाराष्ट्र बातम्या

बिग ब्रेकिंग! हुतात्मा, सिद्धेश्वरसह २६ गाड्या सहा दिवसांसाठी रद्द

भिगवण-वाशिंबे दरम्यान यार्ड रिमोल्डिंग आणि दुहेरीकरण रेल्वे ट्रॅक जोडण्याकरिता नॉन इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक सोमवार, २५ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आला आहे. यात ४ ते ९ ऑगस्ट अशा सहा दिवसांसाठी सोलापूर स्थानकावरून धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेस, सिद्धेश्वर एक्स्प्रेस, मुंबई-गदग एक्स्प्रेससह अन्य २६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

विजय थोरात

सोलापूर : दौंड-कुर्डुवाडी सेक्शनच्या भिगवण-वाशिंबे दरम्यान यार्ड रिमोल्डिंग आणि दुहेरीकरण रेल्वे ट्रॅक जोडण्याकरिता नॉन इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक सोमवार, २५ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आला आहे. यात ४ ते ९ ऑगस्ट अशा सहा दिवसांसाठी सोलापूर स्थानकावरून धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेस, सिद्धेश्वर एक्स्प्रेस, मुंबई-गदग एक्स्प्रेससह अन्य २६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कोरोनातून बाहेर पडताना रेल्वेसमोर प्रवासी वाढविण्याचे आव्हान असतानाच सातत्याने रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक अचानकपणे कोलमडू लागले आहे. त्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत आहे. दरम्यान, आज (मंगळवारी) रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांचा सर्वाधिक फटका सोलापूर-पुणे- मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. हुतात्मा, सिद्धेश्वर, गदग आदी गाड्यांना गर्दी असताना रेल्वे प्रशासनाने या गाड्या रद्द केल्या आहेत. ज्या प्रवाशांनी तीन-चार महिने आधी तिकिटाचे आरक्षण करून ठेवले आहे, त्या प्रवाशांचे नियोजन कोलमडले आहे. त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे.

या एक्स्प्रेस गाड्या रद्द

मुंबई-गदग एक्स्प्रेस, सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, मुंबई- चेन्नई एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, हैदराबाद- मुंबई हुसेनसागर, पुणे- कन्याकुमारी, सिकंदराबाद-राजकोट, काकिनाडा- एलटीटी, म्हैसूर- वाराणसी, यशवंतपूर- बिकानेर, एलटीटी- कराईकल, एलटीटी- मदुराई, एलटीटी-चेन्नई एक्स्प्रेस, बडनेरा- यशवंतपूर एक्सप्रेस, काकिनाडा- भावनगर, कोईमतूर- राजकोट, हुबळी- वाराणसी, म्हैसूर- साईनगर शिर्डी, यशवंतपूर- जयपूर, इंदूर- लिंगमपल्ली, चेन्नई- अहमदाबाद, अहमदाबाद- चेन्नई, चेन्नई-केवाडिया, सिकंदराबाद- पोरबंदर, ओखा-तितुकोरीन.

‘या’ गाड्या कुर्डुवाडी-मिरज-पुणे मार्गे धावणार

  • लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम एक्स्प्रेस

  • मुंबई-तिरुअनंतपुरम

  • मुंबई-न्यू गुवाहाटी एक्स्प्रेस

-----

‘या’ गाड्या आंशिक रद्द

  • बंगळूर-मुंबई उद्यान एक्स्प्रेस सोलापूर स्थानकापर्यंत धावेल

  • हैदराबाद-हडपसर एक्स्प्रेस कुर्डुवाडी स्थानकापर्यंत धावेल

  • नांदेड-पनवेल एक्स्प्रेस कुर्डुवाडी स्थानकापर्यंत धावेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळाचा नवा विक्रम! एका दिवसात २१६ विमानांची वाहतूक; ३३ हजार प्रवाशांचा टप्पा पार

Timber Smuggling: गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; ६० लाखांचे अवैध सागवान जप्त

Latest Marathi News Live Update : राज्यात आज कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

Krishna River Water Level : कोयना धरणातून 33 हजारांवर विसर्ग; कृष्णा नदीने ओलांडली 30 फुटांची पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

NMC MBBS Admission: दिव्यांग विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार साकार; एमबीबीएस प्रवेशासाठी एनएमसीची नवी मार्गदर्शक तत्त्वे दिव्यांगत्वच्या टक्केवारीऐवजी क्षमता आणि कार्यक्षमतेला महत्त्व

SCROLL FOR NEXT