Marriage Bhandara Crime News esakal
महाराष्ट्र बातम्या

Bhandara : लग्न होत नसल्यामुळं 26 वर्षाच्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल; जांभळाच्या झाडाला..

लग्न होत नसल्यामुळं अनेक युवक टोकाचं पाऊल उचलत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

लग्न होत नसल्यामुळं अनेक युवक टोकाचं पाऊल उचलत आहेत.

भंडारा : लग्न होत (Marriage) नसल्यामुळं अनेक युवक टोकाचं पाऊल उचलत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना भंडाऱ्यात (Bhandara) घडलीय. लग्न जुळत नसल्यानं मानसिक तणावात असलेल्या एका 26 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मागील दोन-तीन वर्षांपासून लग्नासाठी मुलीचा शोध घेत असताना देखील लग्न जुळत नसल्यानं मानसिक तणावात असलेल्या एका 26 वर्षीय युवकानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्रीच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील (Lakhandur Taluka) अंतरगाव इथं घडली. नीलेश रामदास सोनटक्के (26) रा. अंतरगाव असं घटनेतील मृत युवकाचं नाव आहे.

मृतक युवक नीलेश मागील 3 वर्षांपासून लग्नासाठी मुलीचा शोध घेत होता. मात्र, लग्न जुळत नसल्यानं नीलेश काही दिवसांपासून तणावात होता. घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास नीलेशनं घराच्या मागील बाजूस असलेल्या जांभळाच्या झाडाला नायलॉन दोरीनं गळफास घेत आत्महत्या केली. घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ निलेशला उपचारासाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून नीलेशला मृत घोषित केलं. या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस (Lakhandur Police) करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT