Education
Education 
महाराष्ट्र

राज्यातील २७ तंत्रनिकेतन महाविद्यालयांना टाळे?

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यातील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्‍निक) संस्थांमधील जागा रिक्त राहत असल्यामुळे संस्थाचालक धास्तावले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील २७ तंत्रनिकेतन बंद करण्याचे प्रस्ताव संस्थाचालकांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठवले आहेत. या संस्था बंद झाल्यास प्रथम वर्षाच्या सुमारे पाच हजार जागा कमी होतील. 

दरवर्षी दहावीनंतर हजारो विद्यार्थी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेश घेत होते; परंतु काही वर्षांपासून पॉलिटेक्‍निककडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे. मागील वर्षी तंत्रनिकेतन महाविद्यालयामधील ७२ हजार जागा रिक्‍त राहिल्या होत्या. त्यामुळे संस्थाचालकांना तोटा सहन करावा लागत आहे. दरवर्षी विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने २७ तंत्रनिकेतन बंद करण्याचे प्रस्ताव संस्थाचालकांनी तंत्रशिक्षण संचालनालयाला पाठवले आहेत. हे प्रस्ताव तपासून तंत्रशिक्षण संचालनालय अंतिम निर्णय घेणार आहे. संस्थाचालकांनी दिलेल्या प्रस्तावांनुसार तंत्रनिकेतन थेट बंद करता येणार नाहीत. सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांची माहिती घेऊन संबंधित पॉलिटेक्‍निक बंद करण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयातील एका अधिकाऱ्याने दिली. संस्था बंद करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होईल. विद्यार्थी नसलेली तंत्रनिकेतने तातडीने बंद करण्याचा आदेश दिला जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT