Politics
Politics Esakal
महाराष्ट्र

Ajit Pawar: "अहमद पटेलांचा पवारांना फोन आला अन्.." पृथ्वीराजबाबांच्या जागी मुख्यमंत्रीपदी या ३ नेत्यांचा केला जात होता विचार?

सकाळ वृत्तसेवा

‘‘तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा आदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिला होता. त्यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील तसेच हर्षवर्धन पाटील यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री करण्याची सूचना केली होती,’’ असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केला.

माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना पवार म्हणाले, ‘‘एके दिवशी शरद पवार यांनी मला व आर. आर. पाटील यांना बोलावून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी मुख्यमंत्रिपदासाठी थोरात, विखे व हर्षवर्धन पाटील या तीन नेत्यांपैकी एकाला पसंती देण्याबाबत विचारणा केली होती. यावर, काँग्रेसच्या अंतर्गत बाबीत आपण न जाण्याचे सुचविल्याचे पवार यांनी सांगितले.

‘‘काँग्रेसकडून राज्यात सुरु असलेल्या नेतृत्वबदलाची माहिती चव्हाण यांना मिळाली असावी. त्यावेळी ते पंढरपूर येथे आषाढी यात्रेसाठी गेले होते. तेथून ते रात्री मुंबई व तेथून दिल्ली येथे गेले. त्या रात्री अडीच वाजता राहुल गांधी परदेशातून येणार होते. त्यामुळे चव्हाण हे विमानतळावर थांबून होते. तिथे त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेत चर्चा केली. दुसऱ्या दिवशी शरद पवार यांना अहमद पटेल यांचा फोन आला व नेतृत्व बदलाची प्रक्रिया थांबली,’’ असे अजित पवार म्हणाले.

फेरबदलाचीही चर्चा

दरम्यान, त्याच दिवशी मी आशुतोष काळे यांच्या लग्नाला उपस्थित होतो. तेथेच राधाकृष्ण विखे पाटील भेटले. त्यांनी नेतृत्व बदलाबाबत चर्चा केली. तेव्हा मी त्यांना तिघांपैकी कोणीही मुख्यमंत्री म्हणून चालेल, असे सांगितले. फेरबदल झाल्यानंतर कोणत्या विभागाला कोणता सचिव द्यायचा, याबाबत विखेंनी चर्चा केली. मुख्यमंत्री बदलले तर सरकार पुन्हा बरखास्त होऊन नवीन सरकार स्थापन होणार असल्याने होणाऱ्या बदलाची त्यांनी चर्चा केली. मात्र पुढे मुख्यमंत्री बदल झाला नसल्याने ही चर्चा पुढे गेली नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काय ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT