zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

मुलाच्या नर्सरी प्रवेशासाठी आता ३ वर्षे वयाची अट! पुढच्या वर्षीपासून बालवाडी ते दुसरीपर्यंतच्या शाळा भरणार सकाळी नऊनंतरच

मूल पहिलीत जाताना त्याचे वय सहा वर्षे पूर्ण असावे लागणार आहे. नव्या धोरणात विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतील, तेव्हा वयाचा निकष तीन वर्षांपर्यंत ठेवला जाणार असून महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सहकार्याने धोरण तयार करण्यात येत आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पुढील शैक्षणिक वर्षापासून केवळ तीन वर्षे वयाच्या मुलांनाच नर्सरीमध्ये प्रवेश मिळणार आहे. शाळा प्रवेशाचे नियम ‘एनईपी-२०२०’च्या नियमांनुसार असावेत, यासाठी धोरण तयार केले जात आहे. ‘एनईपी’नुसार इयत्ता पहिलीत प्रवेश करताना मुलाचे वय सहा वर्षे असावे. नर्सरीसाठी ३ वर्षांची अट असतानाही दोन-अडीच वर्षांच्या अनेक मुलांना प्रवेश दिले. परंतु, आता तसे करता येणार नाही. मूल पहिलीत जाताना त्याचे वय सहा वर्षे पूर्ण असावे लागणार आहे. नव्या धोरणात विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतील, तेव्हा वयाचा निकष तीन वर्षांपर्यंत ठेवला जाणार असून महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सहकार्याने धोरण तयार करण्यात येत आहे.

हिवाळी अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी चिमुकल्यांच्या (बालवाडी ते दुसरीपर्यंतच्या) ज्या शाळा सकाळी सात- साडेसात वाजता भरतात, त्यांच्या वेळा बदलतील आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होईल असे स्पष्ट केले. तत्कालीन व विद्यमान राज्यपालांनीही त्यासंदर्भातील पत्र शिक्षण खात्याला दिले आहे.

दरम्यान, लहान मुले रात्री उशिरापर्यंत (साधारणत: अकरा वाजेपर्यंत) झोपत नाहीत. त्यानंतर सकाळी सात वाजता शाळेत पोचण्यासाठी त्याला सहा- साडेसहा वाजता उठविले जाते. त्यामुळे त्याला सात तासांपर्यंतच झोप मिळते आणि त्याचा थकवा शाळेत जाणवतो. अशा मुलांमध्ये चिडचिडेपणा जास्त आढळतो आणि त्याचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच शाळांच्या वेळा (खासगी व शासकीय) सकाळी नऊनंतर असणार आहेत, अशी माहिती राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

‘प्राथमिक शिक्षण’कडून प्रस्तावाची तयारी

चिमुकल्यांची शाळा सकाळी सात ते साडेसात वाजता भरत असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे चिमुकल्यांच्या शारीरिक व मानसिकतेवर विपरीत परिणाम असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर पुढच्या शैक्षणिक वर्षापासून सर्वच शाळा सकाळी नऊनंतरच भरतील, असा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण खात्याकडून तयार केला जात आहे. त्याला मान्यता घेऊन प्रस्तावानुसार त्याची अंमलबजावणी २०२४-२५च्या शैक्षणिक वर्षापासून होईल, असे प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

पुढच्या वर्षी ‘एक राज्य एक गणवेश’

राज्यातील खासगी अनुदानित व शासकीय शाळांमधील सर्वच मुलांना एकच गणवेश असणार आहे. नवीन गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप असणार आहे. मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट तर मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची, अशा स्वरूपात गणवेशाची रचना असणार आहे. मुलांमध्ये वेगळेपणाची भावना नको हाही त्यामागील उद्देश आहे. या नवीन बदलाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यासंर्दभातील घोषणा यापूर्वीच केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : पठ्ठ्याने भररस्त्यात पेट्रोल ओतून जाळली रिक्षा, पत्नी अडवत ओक्साबोक्सी रडली तरीही थांबला नाही... धक्कादायक कारण समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

Viral Video: नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धीविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, रांग पाहून बसेल धक्का

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

Maharashtra SSC Exam Schedule 2026: तयारीला लागा! SSC बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर, पाहा पहिला कोणता पेपर

SCROLL FOR NEXT