30 special hospitals in maharashtra for corona treatment 
महाराष्ट्र बातम्या

Coronavirus : राज्यात कोरोनासाठी 30 विशेष रुग्णालये; कोणतं रुग्णालय तुमच्या जवळ?

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून २३०५ खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल (ता.०३) दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना  शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवितानाच आवश्यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषित करण्यात आली आहे. 

कोरोनाग्रस्तांसाठी महाराष्ट्रातील कोणती रुग्णालये आणि उपलब्ध खाटा किती?

  • ठाणे- जिल्हा रुग्णालय, टी.बी बिल्डींग (c)
  • मीरा भाईंदर- पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय (100)
  • वाशी- सामान्य रुग्णालय (120)
  • कल्याण डोबिवली म.न.पा.- शास्त्री नगर दवाखाना (100),
  • रायगड- पनवेल उपजिल्हा रुग्णालय (100)
  • नाशिक- कुंभमेळा बिल्डींग व महानगरपालिका कठडा हॉस्पीटल अनुक्रमे (100) (70)
  • अहमदनगर- जिल्हा रुग्णालय (100)
  • नंदूरबार- डोळ्यांचा दवाखाना (50)
  • धुळे- जिल्हा रुग्णालया शहारातील इमारत (50)
  • पुणे- जिल्हा रुग्णालय, औंध (50)
  • सातारा- सामान्य रुग्णालय (60)
  • सिंधुदूर्ग- नविन इमारत एएमपी फंडेड (75)
  • रत्नागिरी- सामान्य रुग्णालय व कळंबोळी उपजिल्हा रुग्णालय अनुक्रमे (100) (50)
  • औरंगाबाद- जिल्हा रुग्णालय (100)
  • हिंगोली- जिल्हा रुग्णालय (100)
  • हिंगोली- कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय (50)
  • लातूर- उदगीर उपजिल्हा रुग्णालय (50)
  • उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालय
  • नविन इमारत (100)
  • उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग (50) आणि तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नविन इमारत (50)
  • नांदेड- जिल्हा रुग्णालय जुने (50) आणि मुखेड उपजिल्हा रुग्णालय (50)
  • अमरावती- विशेषोपचार रुग्णालय नविन इमारत (100)
  • वाशीम- जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत (50)
  • बुलढाणा-स्त्री रुग्णालय नविन इमारत (100)
  • वर्धा- सामान्य रुग्णालय (50)
  • भंडारा- सामान्य रुग्णालय एएमसीएच विंग नविन इमारत (80)
  • गडचिरोली- जिल्हा रुग्णालय (100) यासर्व जिल्हा रुग्णालयातील सर्व खाटा मिळून 2305 खाटा कोरोना बाधीत रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT