MNS Party Worker Resigned E sakal
महाराष्ट्र बातम्या

मनसैनिक राज ठाकरेंवर नाराज, ३५ मुस्लीम कार्यकर्त्यांचा राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंगे काढण्यास सांगितले होते. त्यानंतर झालेल्या उत्तरसभेत देखील मशिदीवरील भोंग्यासाठी अल्टीमेटम दिला. त्यामुळे मनसेचे मुस्लीम कार्यकर्ते राज ठाकरेंवर नाराज आहेत. मुंबईसह मराठवाड्यातील ३५ मनसैनिकांनी (MNS Party Worker Resigned) पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी राज ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

राज ठाकरेंची मुंबईमध्ये गुढीपाडव्यानिमित्त सभा झाली होती. यावेळी राज यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यास सांगितले होते. तुम्ही भोंगे काढले नाहीतर आम्ही भोंग्यावरून हनुमान चालिसा वाजवू असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी भोंग्यावर हनुमान चालिसा लावली. तेव्हापासूनच मनसेमध्ये नाराजी नाट्य सुरू होतं. राज ठाकरेंच्या या भूमिकेला काही मनसैनिकांनी विरोध दर्शवला होता. पुण्यातील वसंत मोरे यांनी देखील विरोध दर्शवला. त्यानंतर त्यांना पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या उत्तरसभेत राज ठाकरेंनी पुन्हा भोंगे उतरविण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे आता मनसैनिक नाराज झालेले पाहायला मिळत आहे.

मनसे कार्यकर्त्यांचा राजीनामा

मनविसेच्या सरचिटणीस आणि कार्यकारणी सदस्य फिरोज खान यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंनी अचानक घेतलेल्या भूमिकांमुळे काम करणे कठीण झाले आहे. आतापर्यंत अनेक आंदोलनात सहभाग घेतला. मात्र, आता बदललेल्या भूमिकेमुळे राजीनामा द्यावा लागतोय, असे फिरोज खान म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जागतिक GDP मध्ये 40 टक्के वाटा ब्रिक्स देशांचा! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा G7 देशांवर निशाणा

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

SCROLL FOR NEXT