Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: एकत्र निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर कोविंद समितीला राजकीय पक्षांकडून 35 निवेदने; CM शिंदेंचेही समर्थन

Eknath Shinde: लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या कोविंद समितीला विविध राजकीय पक्षांकडून आतापर्यंत ३५ निवेदने प्राप्त झाली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या कोविंद समितीला विविध राजकीय पक्षांकडून आतापर्यंत ३५ निवेदने प्राप्त झाली आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र निवडणुका घेण्याचे समर्थन केले आहे.

‘एकत्र निवडणुका घेतल्या तर पैशाची बचत होईलच; पण कमी वेळेत निवडणूक प्रक्रिया पार पडेल,’ असे मुख्यमंत्री शिंदे यांनी कोविंद समितीला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरामच्या निवडणुका अलिकडेच झाल्या होत्या. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्र, हरियानासहित अन्य काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. जर एकत्रित निवडणुका झाल्या असत्या तर राजकीय पक्षांचा वेळ आणि पैसा वाचता असता, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

केंद्रातील ‘एनडीए’ सरकारकडून ज्या महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यात एक देश-एक निवडणुकीचा समावेश आहे. वारंवार निवडणूक होणे अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही, तसेच ही बाब देशाच्या विकासात व्यत्यय आणते, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : अनेक दिवसांच्या घसरणीनंतर सोने पुन्हा तेजीत, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Hartalika Vrat 2025: हरतालिका व्रत कोणी करावे आणि करू नये? जाणून घ्या नियम

Online Gaming Bill: 17,000,00,00,000 रुपये बुडणार! आमिर खान, धोनी, शुभमन गिल... सगळेच चिंतेत

Shubhanshu Shukla : अवकाशात खूप भिती वाटते, पण....गगनयान मिशनबद्दल काय बोलले अंतराळवीर शुभांशू शुक्ला? पाहा व्हिडिओ.

Maharashtra Latest News Live Update : छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा प्रभागरचना आराखडा फेटाळला; मंत्रालयीन दुरुस्तीनंतर पुन्हा सादर

SCROLL FOR NEXT