महाराष्ट्र बातम्या

Rajyabhishek Sohala: 'तो' नेता तडकाफडकी रायगडावरून निघून गेला; राज्याभिषेक सोहळ्यात असं झालं तरी काय?

राज्यातील बडा नेता नाराज होऊन तडकाफडकी रायगडावरून निघून गेल्याची घटना

धनश्री ओतारी

रायगडावर मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा आज तिथीनुसार साजरा झाला. मात्र, राज्यातील बडा नेता नाराज होऊन तडकाफडकी रायगडावरून निघून गेल्याची घटना घडली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (350th Shivrajyabhishek Sohala 2023 Sunil Tatkare angry left Raigad maharashtra politics )

मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी न दिल्याने राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे नाराज होऊन होऊन तडकाफडकी रायगडावरून निघून गेले. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा राज्य सरकारच्या वतीने होत असताना मी एक शिवप्रेमी आणि नागरिक म्हणून सहभागी झालो. सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. पण यावेळी राजशिष्टचाराचे नियम पाळले नाहीत. नियम पायदळी तुडवले. त्यामुळे मी इथून जाण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

तसेच, मला बोलून देतील असं वाटलं होतं पण तसं झालं नाही. राजशिष्टचाराचे नियम पाळले नाहीत. नियोजनांमध्ये अभाव होता. राज्य सरकारचा कार्यक्रम होता पण काही जण आपण स्वतःहून कार्यक्रम करत आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करत होते. असही तटकरे म्हणाले.

पवारांनी मार्गदर्शन करावं

तटकरे यांच्या नाराजीवर मंत्री दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेकाचा सोहळा आहे, त्यात कोणी मानापमानाने येऊ नये. तटकरे हे ज्येष्ठ नेते आहेत. पवारांनी त्यांना थोडे मार्गदर्शन करावे असे मला वाटते. हा सोहळा राजकीय नव्हता, असे दीपक केसरकर म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT