Milk Project esakal
महाराष्ट्र बातम्या

दूध उत्पादकांच्या खात्यांवर 37 कोटी जमा, दीड लाख जणांना अनुदान वाटप; नगर, सोलापूर, पुणे जिल्हे आघाडीवर

Department of Dairy Development : राज्यात सहकारी दूध संघ व खासगी प्रकल्पांमार्फत १६० लाख लिटर दुधाचे संकलन होते.

सकाळ डिजिटल टीम

दुग्धविकास विभागाकडून दूध उत्पादकांच्या अनुदानात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

-किरण कवडे

नाशिक : गायीच्या दुधाला (Cow Milk) प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठी दुग्धविकास विभागाने (Department of Dairy Development) सुरू केलेल्या योजनेचा राज्यातील एक लाख ५१ हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. त्यांच्या बॅंक खात्यावर (Bank Account) ३७ कोटी २० लाखांचे अनुदान आतापर्यंत जमा झाले आहे. विशेष म्हणजे अनुदानाच्या रकमेत दोन रुपयांची वाढ करून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी (Farmers) गोड निर्णय घेतला आहे.

राज्यात सहकारी दूध संघ व खासगी प्रकल्पांमार्फत १६० लाख लिटर दुधाचे संकलन होते. दूध उत्पादकांना १ जुलै २०२४ पासून पाच रुपये प्रतिलिटर अनुदान मिळत आहे. योजनेत राज्यातील १६८ प्रकल्पांमधील एक लाख ५१ हजार ६९३ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. विविध प्रकारच्या चार लाख ९८ हजार ८२१ जनावरांची नोंदही करण्यात आली.

त्या माध्यमातून सात कोटी ४५ लाख २८ हजार ३१४ लिटर दुधाचे संकलन झाले. त्यांना अनुदानापोटी सरकारने ३७ कोटी २० लाख ७० हजार ९१५ रुपये थेट बँक खात्यावर वर्ग केले. १ ऑक्टोबरपासून दूध उत्पादकांना सात रुपये प्रतिलिटर याप्रमाणे अनुदान मिळेल. दूध भुकटी उत्पादकांनाही अनुदान वितरित केले जाते.

दोन रुपयांनी वाढ

दुग्धविकास विभागाकडून दूध उत्पादकांच्या अनुदानात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पूर्वी पाच रुपये लिटरप्रमाणे मिळणारे अनुदान १ ऑक्टोबरपासून सात रुपये करण्यात आले आहे. त्यासाठी ८७९ कोटी रुपयांच्या वाढीव निधीला सरकारने गुरुवारी मंजुरी दिली.

राज्यातील सर्व सहकारी व खासगी दूध प्रकल्पांनी या योजनेत सहभागी होऊन अनुदानाचा लाभ घ्यावा. अनुदानात वाढ झाल्याने त्याचाही फायदा शेतकऱ्यांना निश्‍चितपणे होणार आहे.

-प्रशांत मोहोडे, आयुक्त, दुग्धविकास विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT