Shinde Government Latest News esakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे ४ आमदार! पण मतदारसंघातील ४५ गावे पितात दूषित पाणी

२०२१-२२ च्या भूजल सर्वेक्षणातून उघड झाली आहे. वर्षातून दोनदा पाणी नमुने घेऊनही करमाळा, सांगोला, माळशिरस व मंगळवेढा या चार तालुक्यांतील ४५ गावांमधील पिण्याच्या पाण्याचे जवळपास १२० स्रोत दूषित आढळले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील २४२ गावांतील लोक शरीराला अपायकारक असे दूषित पाणी पितात, ही बाब २०२१-२२ च्या भूजल सर्वेक्षणातून उघड झाली आहे. वर्षातून दोनदा पाणी नमुने घेऊनही करमाळा, सांगोला, माळशिरस व मंगळवेढा या चार तालुक्यांतील ४५ गावांमधील पिण्याच्या पाण्याचे जवळपास १२० स्रोत दूषित आढळले आहेत.

दूषित पाणी सातत्याने सेवन केल्यास पोटाचे विकार, स्नायुदुखी, किडनीचे आजार होतात. त्यामुळे वर्षातून दोनदा गावोगावी पाहणी करून सर्वाधिक वापर असलेल्या पाण्याच्या स्रोतातून पाणी नमुने घेतले जातात. त्याची लॅबमध्ये पडताळणी केली जाते आणि त्यातून पाण्यातील घटक किती प्रमाणात आहेत हे समजते. आरोग्याधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाण्यातील हार्डनेस (जडत्व), लोह, अलकॅलिनिटी, क्लोराईड, सल्फेट आणि टीडीएसचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असणे आणि त्याच पाण्याचे सातत्याने सेवन केल्यास संबंधित व्यक्तीचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे ब्लीचिंग पावडर, तुरटी असे घटक टाकून पाणी शुद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, २४२ गावांतील काही ठिकाणच्या पाण्याचे स्रोत खूपच दूषित झाले आहेत. तरीपण, नागरिक त्याच हातपंप किंवा विहिरीचे पाणी प्यायला वापरतात. पाणीपुरवठा व स्वच्छता आणि आरोग्य विभागाला झेडपीकडून स्वतंत्र निधी मिळतो. तो निधी नागरिकांना प्यायला शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी खर्च करावा, अशी मागणी होत आहे.

चार तालुक्यांतील दूषित पाण्याची ४५ गावे

  • करमाळा : बालेवाडी, चिखलठाण, देवळाली, जिंती, कंदार, कविटगाव, केत्तूर, खडकी, पुनवाड.

  • सांगोला : अकोला, बुरंगेवाडी, चिणके, जवळा, कडलास, लक्ष्मीनगर, वाडेगाव.

  • माळशिरस : बागेचीवाडी, भांबुर्डी, चाकोरे, डोंबाळवाडी, कदमवाडी, कुरबावी, लोंढे-मोहितेवाडी, मेडद, मिरे, मोटेवाडी, उंबरे दहिगाव.

  • मंगळवेढा : बावची, बोराळे, देगाव, धरमगाव, ढवळस, गोणेवाडी, माचणूर, मल्लेवाडी, मारापूर, मरवडे, मारोळी, नंदेश्वर, रोहितेवाडी, सलगर बु., शिरनांदगी व तामदर्डी.

आमदारांनी स्वच्छ पाण्यासाठी घालावे लक्ष

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जाणारे पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या विधानसभा मतदारसंघातील तब्बल ७० गावे (पंढरपूर ५३ आणि मंगळवेढा १७), आमदार राम सातपुते यांच्या माळशिरस मतदारसंघातील १२ गावे, संजय शिंदे यांच्या करमाळा मतदारसंघातील नऊ गावे व ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं कसं ओक्केमधी हाय’ म्हणत देशभर पोचलेले आमदार शहाजी पाटील यांच्या सांगोला मतदारसंघातील सात गावे, अशी एकूण चार तालुक्यातील ४५ गावांमधील पाणी दूषित आढळले आहे. आमदार पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. या आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी त्यांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी विशेष लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT