ganpatrao deshmukh sakal
महाराष्ट्र बातम्या

४० ते ७२ वर्षे एकाच पक्षात! गणपतआबा, आडम‌ मास्तर अन्‌ सुशिलकुमार शिंदे पक्षनिष्ठेचे आदर्श

दिवस उजाडला की अंधार ठरलेलाच, वादळे येतात जातात, सुख-दु:ख प्रत्येकाच्या जीवनात असतेच. राजकारणात कधी हा पक्ष तर कधी तो पक्ष सत्तेत येतो. त्यामुळे अडचणीच्या काळात पक्षाला सावरून विरोधकांना वरचढ ठरण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित असते. ज्या पक्षाने आपल्याला ओळख दिली, पदे, जनाधार दिला, त्याला अर्ध्यावर सोडून देणे म्हणजे निष्ठा नव्हेच.

तात्या लांडगे

सोलापूर : दिवस उजाडला की अंधार ठरलेलाच, वादळे येतात जातात, सुख-दु:ख प्रत्येकाच्या जीवनात असतेच. पण, अशावेळी निष्ठा, प्रामाणिकपणा जपायची असते. राजकारणात कधी हा पक्ष तर कधी तो पक्ष सत्तेत येतो. त्यामुळे अडचणीच्या काळात पक्षाला सावरून विरोधकांना वरचढ ठरण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित असते. ज्या पक्षाने आपल्याला ओळख दिली, पदे, जनाधार दिला, त्याला अर्ध्यावर सोडून देणे म्हणजे निष्ठा नव्हेच. तरीदेखील, आता जिल्ह्यातील काही मातब्बर नेतेमंडळी स्वत:ची मोठी ताकद असतानाही विरोधी पक्षात जाऊन आपले राजकीय बस्तान सुरक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेकांना ‘ईडी’ची भीती आहे तर काहींच्या मनात पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी दुर्लक्ष करीत असल्याची खंत आहेत. अडचणीच्या काळात पक्षाला ‘बाय बाय’ करणाऱ्यांनी गणपतआबा, आडम मास्तर व शिंदेसाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. त्यांनी कधीच स्वत:साठी ना साखर कारखाना ना मोठ्या शैक्षणिक संस्था उभारल्या. पण, त्यांच्यामागे कायमस्वरूपी मोठा जनाधार आहे.

sushilkumar shinde

सुशीलकुमार शिंदे ४० वर्षे काँग्रेससोबतच

न्यायालयात पट्टेवाला, पोलिस उपनिरीक्षक ते केंद्रीय गृहमंत्री असा प्रवास करणारे सुशीलकुमार शिंदे १९८० पासून आजही काँग्रेसमध्येच असून पूर्वीदेखील काँग्रेसमध्येच होते. पण, १९७८ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत काँग्रेस सोडली आणि ब्रह्मानंद रेड्डी, यशवंतराव चव्हाण यांच्या काँग्रेसमध्ये सहभागी झाले. ज्यावेळी जनतेने इंदिरा गांधी यांचीच काँग्रेस खरी असल्याचा कौल दिला आणि त्यानंतर शिंदेंनी पुन्हा काँग्रेसमध्येच प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कधीच काँग्रेस सोडण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांना अनेकदा विविध पक्षातून ऑफर आली, पण ते पक्षासोबत एकनिष्ठ राहिले. जनसेवा करताना त्यांनी कधीच आपल्या कुटुंबियांसाठी ना साखर कारखाना ना शैक्षणिक संस्था उभारली. अनेकांनी अडचणीच्या काळात त्यांची साथ सोडली, पण ते डगमगले नाहीत, असे नेते राजकारणात खूपच कमी आहेत. त्यांची कन्या प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या सलग तीनवेळा आमदार आहेत.

आमदार नरसय्या आडम

१९६८ पासून आडम मास्तर ‘माकप’मध्येच

काळ बदलला आणि राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली. पण, १९६८ पासून नरसय्या आडम मास्तर मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षातच आहेत. ज्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली, त्यावेळी लोकशाही धोक्यात आल्याचे सांगून शरद पवार यांनी १९७८ मध्ये काँग्रेसविरोधात बंड केले आणि सरकार पाडले. त्यावेळी नरसय्या आडम मास्तर आमदार होते. त्यांनी राजकारणात अनेक बदल पाहिले, लोकांच्या प्रश्नांवर सातत्याने ते रस्त्यावर उरतले. कामगार नेता, लढवय्या नेता म्हणून त्यांची ख्याती देशभर पोहचली आणि त्यांना वेगवेगळ्या पक्षातून संधी आली. मात्र, त्यांनी पक्षनिष्ठा कधीच सोडली नाही. मास्तर तब्बल ५४ वर्षांपासून ‘माकप’मध्येच आहेत. त्यांच्या पक्षातून विधानसभेची निवडणूक लढताना त्यांना अनेकदा पराभव स्वीकारावा लागला, पण कधीच पक्ष सोडण्याचा विचार केला नाही.

Ganpatrao Deshmukh

आबा ७२ वर्षे शेकापसोबत एकनिष्ठ

१९४६ च्या सप्टेंबर महिन्यात काँग्रेसच्या भूमिकेविरोधात ११ सप्टेंबर १९४६ रोजी शंकरराव मोरे यांनी भाऊसाहेब राऊत, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, रामभाऊ नलावडे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने ‘शेतकरी-कामकारी संघ’ स्थापन केला. ११ जानेवारी १९४७ रोजी मुंबईतील फणसवाडी येथील बैठकीवेळी यशवंतराव चव्हाण यांनी ‘शेतकरी-कामकरी पक्षा’ला विरोध केला. त्याला खचून न जाता पुण्यात भाऊसाहेब शिरोळे यांच्या घरी ‘शेतकरी-कामकरी’ ऐवजी ‘शेतकरी-कामगार पक्ष’ स्थापन्याचा निर्णय घेतला. १९५२ साली शंकरराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली ‘शेकाप’चे विक्रमी २८ आमदार निवडून आले. हे यश ‘शेकाप’ला टिकवता आले नाही, पण रायगड जिल्ह्यात बरेच वर्षे शेतकरी कामगार पक्षाचाच आमदार होता. दुसरीकडे आमदार गणपतराव देशमुख यांनी तर सांगोला विधानसभेतून सतत ११ वेळा निवडून येण्याचा विक्रम केला. त्यांनी शेवटपर्यंत ‘शेकाप’ सोडला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT